HW News Marathi
महाराष्ट्र

‘रात्रीची संचारबंदी करण्याचा निर्णय नाही’, विजय वडेट्टीवारांची माहिती

नागपूर | राज्यात जरी कोरोना रुग्णसंख्या कमी झाली असली तरी देखील तिसऱ्या लाटेची भीती कायम आहे. गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्यात रात्रीची संचारबंदी लागू होण्याची शक्यता वर्तवली जात होती. राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी ही शक्यता फेटाळून लावली आहे. नाईट कर्फ्यूचा निर्णय झालेला नाही. किंबहुना त्याची चर्चाच झाली नाही. तसेच रात्रीची संचारबंदी लागू करण्याचा कोणताही प्रस्ताव विचाराधीन नाही, असं विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलं आहे.

निर्बंध लावावेत असे कोणाला वाटेल?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुढे बोलताना ते म्हणाले, “राज्याचा मुख्यमंत्री म्हणून सरकारला या संकटाशी सामना करण्यासाठी संपूर्ण तयारीत राहण्याच्या स्पष्ट सूचना आहेतच, पण सत्ताधारी, विरोधी अशा सर्वच पक्षांना मी आवाहन करीत आहे की, आता अधिक काळजी घ्या. गर्दीचे कार्यक्रम टाळा. सण, उत्सव आले आहेत, त्यावर निर्बंध लावावेत असे कोणाला वाटेल? पण शेवटी आपले आरोग्य, प्राण महत्त्वाचे. उत्सव नंतरही साजरे करू”.

पण त्यातून धोका वाढला

निर्बंध शिथिल करण्यासाठी अनेकांनी मुख्यमंत्र्यांकडे मागण्या केल्या आहेत. त्यावर देखील उद्धव ठाकरे यांनी भाष्य केलं आहे. “हे उघडा ते उघडा’ या मागण्या ठीक आहेत, पण त्यातून धोका वाढला आहे. प्रत्येकाने नियम आणि मर्यादा पाळल्या तर पुन्हा कडक निर्बंध लावण्याची वेळ येणार नाही. म्हणूनच माझ्या शिवसेनेसह सर्वच राजकीय पक्षांना मी विनम्र आवाहन करीत आहे, आपण सगळ्यांनीच शहाणपणाने वागून लोकांच्या जिवाचे रक्षण करायला हवे. सण, उत्सव आज झाले नाहीत तर उद्या नक्की येतील, पण घरातला प्रत्येक माणूस आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. लोकांच्या जिवावरील विघ्न टाळायचे असेल तर, शासनाने वेळोवेळी आखून दिलेल्या आरोग्याच्या नियमांचे पालन होईल हे काटेकोरपणे पहा, गर्दी करू नका. सार्वजनिक कार्यक्रम टाळा. राजकीय सभा, संमेलनांना उत्तेजन देऊ नका, हीच त्या विघ्नहर्त्या श्री गणेशाची इच्छा असेल”, असं मुख्यमंत्री म्हणाले आहेत.

या लाटेत ऑक्सिजनचा मोठा तुटवडा

मला वारंवार आपणांस हे आवाहन एवढ्याचसाठी करावे लागते आहे, कारण कोविड परत वाढतोय. येणारे दिवस आव्हानात्मक असतील आणि परिस्थिती हाताबाहेर जाऊ द्यायची नसेल तर विशेषतः सर्व राजकीय पक्षांवर त्याची प्रमुख जबाबदारी आहे, असेही मुख्यमंत्री म्हणतात. दुसऱ्या लाटेची सुरुवात कशी झाली त्याची आपणास पूर्ण कल्पना आहे. या लाटेत ऑक्सिजनचा मोठा तुटवडा होऊन बिकट परिस्थिती निर्माण झाली होती. केवळ महाराष्ट्रच नव्हे तर देशाला देखील यातून जावे लागले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोरोनाची लाट ओसरताच शिवसेनेत मेगा भरती; कुठल्या पक्षाला लागणार गळती?

News Desk

आता तरी ‘ही’ गडबड आणि पडझड मान्य करणार का?, सामनातून मोदींना सवाल

swarit

दिल्लीतल्या शेतकरी आंदोलनात भाजपचा एक गट घुसल्यानं…राऊतांचा भाजपवर गंभीर आरोप  

News Desk