HW News Marathi
महाराष्ट्र

‘कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाही’, मुख्यमंत्र्यांचा सांगलीकरांशी संवाद!

सांगली। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सांगली दौऱ्यावर आहेत. सांगली जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी पावसाने कहर माजवला होता. यामधूनच अतिवृष्टी आणि महापुरामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी सांगलीतल्या नागरिकांशी संवाद साधून नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली.

पूर परिस्थितीची पाहणी

सकाळी अकरा वाजल्यापासून उद्धव ठाकरे अंकलखोप, भिलवडी, मौजे डिग्रज, कसबे डिग्रज आणि सांगली येथे पूर परिस्थितीची पाहणी करत आहेत. तसेच पूरग्रस्तांच्या भेटीगाठी घेऊन दुपारी एक वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात पूर परिस्थिती बाबत आढावा बैठक घेतील.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा सांगली दौरा

यातून मार्ग काढणारच, किती नागरिकांना मदत करावी लागेल याची माहिती घेत आहोत, आपल्याला कायमस्वरुपी तोडगा काढावा लागेल, काही ठिकाणी कटू निर्णय घ्यावे लागतील, कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाही, हे माझं वचन आहे, पण कटू निर्णयालाही साथ द्यावी लागेल अन्यथा २००५, २०१९ आणि २०२१ अशी पुरांची मालिका सुरु राहायची, दरवर्षी नुकसान आणि मदत हे चक्र भेदावं लागेल. कायमस्वरुपी तोडगा काढावा लागेल.

सरकार तुमचं आहे. तुम्ही अजिबात काळजी करु नका

संकट आल्यानंतर पॅकेज जाहीर करतात, पण ते पॅकेज जातं कुठं माहिती नाही. मी प्रामाणिकपणे मदत करणार आहे. हे सरकार तुमचं आहे. तुम्ही अजिबात काळजी करु नका. सगळ्या प्रशासनाकडून आढावा आला आहे., जे जे करणे सत्य आहे, ते ते केल्याशिवाय राहणार नाही.यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगली जिल्ह्यातील अंखलखोप या गावात जाऊनही संवाद साधला.

मुख्यमंत्री काय म्हणाले

तुमच्यावर जी आपत्ती ओढावली आहे, त्यातून तुम्हाला उभं करण्याची जबाबदारी सरकारची आहे. त्यातून तुम्हाला बाहेर काढेन पण समोर जी गर्दी केली आहे, ती काळजीची आहे. कोरोनाचं संकट टळलेलं नाही. तुमच्या व्यथा आमच्यापर्यंत पोहोचल्या आहेत. त्याची काळजी करु नका, बाहेर फिरताना मास्क घाला, अंतर पाळा, पावसाळी आजार पसरत आहेत. आपण आरोग्य कॅम्प लावत आहोत.

पावसाने प्रचंड नुकसान झालं आहे. घरं, संसार वाहून गेले आहेत. घरादारात चिखलाचं साम्राज्य आहे. केवळ नुकसानभरपाई उपयोगाची नाही, कायमस्वरुपी तोडगा काढावा लागेल. त्यासाठी तुमचं सहकार्य लागेल. हे सरकार तुमचं आहे. तुमचा आशिर्वाद महत्त्वाचा आहे. गर्दी करु नका, मास्क वापरा

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मराठा आरक्षणाबाबत खंबीर, राज्य सरकारला गंभीर केल्याशिवाय राहणार नाही- उदयनराजे भोसले

News Desk

महाराष्ट्रात सातव्या वेतन आयोगाला अखेर मुहूर्त लाभला

News Desk

मुख्यमंत्र्यांनी साधला शिवभोजन योजनेतील लाभार्थ्यांशी थेट संवाद

News Desk