HW News Marathi
Covid-19

धारावीतील लोकांच्या कोरोनाच्या टेस्ट केल्या जात नाहीत – दरेकरांचा आरोप

मुंबई | राज्यात कोरोनाचे सगळ्यात जास्त रुग्ण हे मुंबईत आहेत. मुंबईत कोरोनाचे हॉटस्पॉट तयार होण्यास सुरुवात झाली. आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी ही मुंबईत आहे जीचे नाव धारावी. या धारावीतील एक एक करत कोरोनाचे रुग्ण सापडायला सुरुवात झाली आणि बघता बघता संख्या खूपच वाढत गेली. मात्र, काही दिवसांपासून धारावीतील कोरोनाचे जास्त रुग्ण आढळले नाही आहेत.

गेल्या पाच दिवसात धारावीतील रुग्णवाढीचा वेग मंदावलेला पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे काल ( ६ जून)धारावीत केवळ १० रुग्ण आढळून आले. त्यामुळे मुंबईतील कोरोनाचे हॉटस्पॉट असलेल्या धारावीत आता हळूहळू कोरोना नाहीसा होताना दिसत आहे.

मात्र, भाजपचे विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी हे सर्व दावे फेटाळून लावले आहेत. आकडे लपवण्याच्या नादात धारावीतील लोकांच्या टेस्टच केल्या जात नाहीत. त्यामुळे नवे रुग्ण सापडण्याचे प्रमाण कमी झाले आहे. याचा जाब विचारल्यावर लक्षण नसलेल्या लोकांच्या टेस्ट करत नाहीत, या ICMRच्या मार्गदर्शक सूचनेचा दाखल यंत्रणेकडून दिला जातो. त्यामुळे आता आम्ही थेट ICMR शी बोलणार असल्याचे प्रवीण दरेकर यांनी सांगितले आहे.

आज (७ जून) औरंगाबादेत पत्रकारपरिषद घेतली यावेळी दरेकरांनी म्हटले की, केंद्र सरकारने कोरोनाशी लढण्यासाठी राज्य सरकारला मोठी मदत केली आहे. त्यामुळे केंद्राच्या नावाने ओरड करणे योग्य नाही. उलट राज्यातील आरोग्य यंत्रणेकडून हेळसांड झाल्याने मुंबईत अनेक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यापैकी काहींना वेळेत रुग्णवाहिका मिळाली नाही तर काहींना रुग्णालयात बेडच उपलब्ध नव्हते. या सगळ्यामुळे लोकांचे जीव जात आहेत. धारावीतही अलीकडे कोरोना टेस्टची संख्या कमी झालेली आहे. आकडे लपवण्यासाठी सरकार ही आयडिया लढवत असेल तर हा प्रकार गंभीर असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘कोल्हापुरातले निर्बंध 5 दिवसांसाठी शिथिल’ सरकारचा दिलासा

News Desk

राज्यात गेल्या २४ तासांत ५० हजारांच्या पुढे आढळले नवे कोरोना रूग्ण

News Desk

सोलापुरात कोरोनामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी आमदाराचा मृत्यू

News Desk