HW News Marathi
Covid-19

मी पंढरपूरला जाणार, विठुरायाकडे कोरोनाचे संकट नष्ट करण्याचे साकडे घालणार | उद्धव ठाकरे

मुंबई | “मुख्यमंत्री या नात्याने नाही, तर तुमचा वारकरी बांधवांचा प्रतिनिधी म्हणून मी पंढरपूरला जाणार आहे,” असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी आज (२८ जून) जनतेशी फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधला ते बोलत होते. मुख्यमंत्री पुढे म्हणाले, “मी विठुरायाकडे संपूर्ण जगावर आलेले कोरोनाचे संकट नष्ट करण्याचे साकडे घालणार आहे,” असे त्यांनी सांगितले.

उद्धव ठाकरे म्हणाले, “आषाढी एकादशीची परंपरा कित्येक वर्षापासूनची आहे. मी २०१० ला वारीत प्रत्यक्ष सहभागी न होता हेलिकॉप्टरच्या माध्यमातून सहभागी झालो होतो. तेव्हा पांडूरंगाचे दर्शन घेतले. मी विठ्ठल पाहिला, मंदिरात जाऊन नाही, पण अथांग पसरलेल्या वारकऱ्यांमध्ये मला विठ्ठलाचे विश्वरुप दिसले. वारकऱ्यांनी सयंम दाखवला आणि नाईलाज म्हणून वारीचा सोहळा आटोपशीर करावा लागला.”

“वारकऱ्यांनो तुमचे आशीर्वाद माझ्या पाठीशी असू द्या. ते आशीर्वाद घेऊन मी विठुरायाचे आशीर्वाद घ्यायला जाईन. मला खात्री आहे, जर तुम्ही मागे उभे राहिलात, तर आपली विठू माऊलीही माझ्या साकड्याला यश दिल्याशिवाय राहणार नाही. तुमचे आशीर्वाद मी मागत आहेत,” असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“अनिल देशमुख तुम्ही मंदिर भूमिपूजनासाठी ठाकरे-पवारांची परवानगी घेतली का ?” भाजपने डिवचलं

News Desk

अमेरिकेत इतर देशांच्या तुलनेत ५ दशलक्षाहून सर्वाधिक कोरोनाच्या चाचण्या झाल्या, ट्रम्प यांची माहिती

News Desk

कोरोना योद्ध्यांना सरकारी नोकरीत प्राधान्य, मोदींची मोठी घोषणा

News Desk