HW News Marathi
महाराष्ट्र

नीलम राणे, आमदार नितेश राणेंविरोधात लूकआऊट सर्क्युलर जारी!

पुणे | भाजप आमदार नितेश राणे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या पत्नी नीलम राणे यांच्या विरोधात लूकआऊट सर्क्युलर जारी करण्यात आला आहे. ‘डीएचएफएल’ कर्ज प्रकरणी केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या पत्नी नीलम राणे आणि आमदार नितेश राणे यांना पुणे पोलिसांकडून लुकआउट सर्क्युलर जारी करण्यात आली. कंपनीकडून घेतलेलं ६५ कोटींचं कर्ज थकवल्याप्रकरणी पुणे गुन्हे शाखेने हा सर्क्युलर पाठवली आहे.

दिवाण हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीने तक्रार नोंदवली होती. आर्टलाईन प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेडने २५ कोटींचं कर्ज घेतलं होतं. तर नीलम राणे या आर्टलाईन प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेडच्या सहअर्जदार होत्या. या कर्जाची परतफेड न केल्याने तक्रार दाखल करण्यात आली होती.

याचबरोबर नीलम हॉटेल्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने डीएचएफएल कडून ४० कोटींचं कर्ज घेतलं होतं. या कर्जाची परतफेड न झाल्याने डीएचएफएल संबंधित एजन्सीकडे याप्रकरणी तक्रार केली होती. त्यांनंतर पुणे पोलिसांनी ही लुक आउट सर्क्युलर जारी केलेली आहे.

३ सप्टेंबर रोजी ही लुकआउट सर्क्युलर पाठवली गेली आहे. हे पत्र छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रशासनाला देखील पाठवलेलं आहे. मात्र, लुकआट नोटीस जारी होणं म्हणजे आरोपी आहे असं होत नाही. तरी देखील या लुकआउट नोटीसवर आता राणे कुटुंबियांची काय प्रतिक्रिया येते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

पुणे गुन्हे शाखा आयुक्तांचं असं म्हणणं आहे की, आमच्याकडे तक्रार आली होती व त्यानंतर संबंधित न्यायालयाकडून आदेश आल्यानंतर लुकआउट सर्क्युलर जारी केली गेली आहे. आम्ही नियमांचे पालन केले आहे व नियमाप्रमाणे जी थकबाकी आहे ती पाहता डीएचएफएलकडून तक्रार करण्यात आली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

HW Exclusive : “मुंबई महानगरपालिका निवडणूक एकटे लढणार”, भाई जगताप यांची मोठी घोषणा

Aprna

महा डीबीटी पोर्टलद्वारे लाभ घेण्यासाठी ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ! – धनंजय मुंडे

Aprna

“हे ठाकरे सरकार नाही तर राष्ट्रवादीचं सरकार”, देवेंद्र फडणवीसांचा घणाघात

News Desk