HW News Marathi
महाराष्ट्र

विधानसभेसाठी आता काँग्रेस राज्यभर घेणार विभागवार बैठका

मुंबई | यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात कॉंग्रेसला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागल्यानंतर आता आगामी विधानसभा निवडणुकांसाठी काँग्रेसने मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. दरम्यान, आता महाराष्ट्र काँग्रेसची संपूर्ण जबाबदारी नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यावर आहे. आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यापुढे जनसंपर्क येत्या काळात काँग्रेस महाराष्ट्र दौरा काढणार असल्याची माहिती यापूर्वी मिळत होती. तर बाळासाहेब थोरात लवकरच पक्षाच्या विभागवार बैठका घेणार असल्याची माहिती मिळत होती.

काँग्रेसच्या या विभागवार बैठकांमध्ये मतदारसंघांमधील उमेदवार, आगामी विधानसभा निवडणुकीची रणनीती, तसेच राज्याच्या पक्षातील सद्यस्थितीवर चर्चा होणार असल्याची माहिती मिळत आहे. लोकसभेत झालेल्या दारूण पराभवानंतर विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेसला नवसंजीवनी देण्यासाठी बाळासाहेब थोरात यांनी आता मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. काँग्रेसकडून येत्या गुरुवारपासून (२५ जुलै) शनिवारपर्यंत (२७ जुलै) अनुक्रमे मुंबई-कोकण विभाग, नाशिक विभाग, पुणे विभाग असे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहेत. या बैठकीला पक्षाचे कार्याध्यक्ष, जिल्हाध्यक्ष उपस्थित असतील.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

२०१४मध्ये भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेनेकडून काँग्रेसला प्रस्ताव !

swarit

15 वर्षाच्या मुलीवर सामुहिक बलात्कार, तिघांना अटक एक जण फरार

News Desk

दाऊद इब्राहिम मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी नवाब मलिकांच्या मुलाला ED कडून समन्स

Aprna