HW News Marathi
महाराष्ट्र

आता माझी कोणतेही पद घेण्याची इच्छा नाही !

मुंबई | “भाजपमध्ये नवीन लोकांची संख्या वाढत चालली आहे. नव्या लोकांना संधी दिल्याने भविष्यात पक्षाचे महत्त्वही वाढत जाणार आहे. मात्र, यापुढे माझी कोणतेही पद घेण्याची इच्छा नाही”, असे विधान भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी केले आहे. दरम्यान, एकनाथ खडसे हे राज्य मंत्रिमंडळ विस्तारासह अन्य काही मुद्द्यांवरून पक्षावर नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत होती. तशी नाराजी खडसे यांनी काहीच दिवसांपूर्वी व्यक्त देखील केली आहे. मात्र, आता आपण पक्षावर नाराज नसल्याचे एकनाथ खडसे यांच्याकडून सांगण्यात येत आहे.

“मी पक्षावर नाराज नसून पक्षात येणाऱ्या नव्या मंडळींमुळे पक्ष वाढत आहे. नव्या मंडळींना संधी दिल्याने पक्षाचे भविष्यही वाढत आहे. त्यामुळे, सध्या मला पक्षाने दिलेली जबाबदारी मी सांभाळत आहे.

आता कोणतेही पद घेण्याची माझी इच्छा नाही”, असे खडसे म्हणाले. बोदवड नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षपदी निवडून येत भाजपची सत्ता कायम ठेवल्याबद्दल खडसे यांनी अभिनंदन केले आहे. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.

मंत्रिमंडळ विस्तारावरून नाराजी

एकनाथ खडसे यांनी काहीच दिवसांपूर्वी “पक्षात आयात केलेल्या लोकांना संधी दिली जात आहे” असे म्हणत भाजपला घरचा आहेर दिला होता. त्यावर “राजकरणात सर्व गोष्टींचा विचार करावा लागतो. लोकसभेत आम्ही पक्षात नवीन लोक घेतली. मात्र, त्यांच्यामुळेच अनपेक्षित निकाल लागला. खडसे साहेब आमचे नेते आहेत. त्यांच्या या विधानाचे आश्चर्य वाटते”, अशी प्रतिक्रिया गिरीश महाजन यांनी दिली होती. मात्र, आता खडसे यांनी आपली भूमिका पूर्णपणे बदलल्याचे चित्र दिसत आहे.

सभागृहात भाजपला घरचा आहेर

“गेल्या ५ वर्षात राज्यात सर्वात जास्त कुपोषणाने बालकांचा मृत्यू झाला आहे. सरकारला कधी जाग येणार ?”, असा सवाल करत विभासभेत उपस्थित करून एकनाथ खडसे यांनी सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे. एकनाथ खडसे हे भाजपचे नेते असल्याने सभागृहात सर्वांच्या नजरा त्यांच्यावर खिळल्या. एकनाथ खडसेंनी हा सवाल उपस्थित करत भाजपला घरचा आहेर दिला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

MPSC ची परीक्षा होणार की नाही ? मोठी आणि महत्वाची बातमी

News Desk

“परमबीर सिंह-सचिन वाझेंची भेट नियमबाह्य, पोलिसांकडून होणार चौकशी!” – गृहमंत्री

News Desk

दाऊदला कुठल्याही परिस्थितीत भारतात आणावे, रोहित पवारांची पंतप्रधानांना विनंती

News Desk