मुंबई | विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज (२१ डिसेंबर) एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. नाशिकमध्ये शिवसेनेला मोठा धक्का देत शिवसेनेचे माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, भाजपचे नेते आमदार गिरीश महाजन यांच्या उपस्थित बाळासाहेब सानप यांच्या पक्षप्रवेश पार पडल्यानंतर देवेंद्र फडणवीस बोलत होते. “आपल्याला पक्ष मजबूत करायचा आहे. भाजपमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसमधील अनेक नेते भाजपमध्ये यायला उत्सुक आहेत. लवकरच त्यापैकी अनेक नेत्यांचा भाजपमध्ये देखील प्रवेश होणार आहे”, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
“पक्षापासून दूर गेलेले बाळासाहेब सानप पुन्हा एकदा भाजपात परतले आहे. कुंभमेळ्यांच्या वेळी सानप यांच्यावर जबाबदारी देण्यात आली होती. त्यांनी खूप चांगल्या प्रकारे काम केलं. सानप हे जमिनीशी जोडलेले नेते आहेत. कुणीही वाद करण्याचं कारण नाही. जुने-नवे अशी कोणतीही अडचण येणार नाही. आपल्याला पक्ष मजबूत करायचा आहे. नाशिक भाजपाचा बाल्लेकिल्ला झाला आहे. भाजपमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसमधील अनेक नेते भाजपमध्ये यायला उत्सुक आहे. लवकरच त्यापैकी अनेक नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश देखील होणार आहे. विरोधकांकडून भाजपमधील अनेक नेत्यांच्या संपर्कात असल्याचा बाऊ करण्यात येत आहे. मात्र वास्तवात उलट तिन्ही पक्षातील अनेक नेते भाजपमध्ये यायला उत्सुक आहेत”, असे देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.