मुंबई | मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी (२७ जून) बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित अशा मराठा आरक्षणासंदर्भात अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला आहे. मराठा समाजाचे आरक्षण वैध ठरवत मराठा समाजाला शिक्षण क्षेत्रात १३ टक्के तर नोकरीत १२ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने घेतला आहे. या महत्त्वपूर्ण निकालामुळे मराठा समाजाला मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, मराठा समाजाच्या आरक्षणाविरुद्धच्या सर्व याचिका देखील उच्च न्यायालायने फेटाळून लावल्या आहेत. त्यामुळे आता हे याचिकाकर्ते मराठा समाजाच्या आरक्षणाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार असल्याची माहिती मिळत आहे.
Bombay High Court has upheld the reservation but says "16% is not justifiable." https://t.co/tnIVEKhybD
— ANI (@ANI) June 27, 2019
मराठा समाजाला दिलेले आरक्षण हे घटनाबाह्य असून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सिद्धांतांची गळचेपी असल्याचे याचिकाकर्ते वकील गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटले आहे. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या मराठा आरक्षणाला वैध ठरविणाऱ्या या निकालाला आव्हान देण्याचा निर्णय याचिकाकर्त्यांनी घेतल्याची माहिती मिळत आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.