HW News Marathi
महाराष्ट्र

आता राणेंचा उद्धववर हल्ला

मुंबई: महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांच्या संभाव्य मंत्रिमंडळ प्रवेशामुळे शिवसेना-भाजप यांच्यातील संबंधात तणाव निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे यांनी थेट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. ह्यवाजले की बाराह्ण अशा शीर्षकाखाली नितेश राणेंनी एक व्यंगचित्र ट्विट केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नारायण राणे यांच्या भेटीने उद्धव ठाकरेंची झोप उडाल्याच्या आशयाचे हे व्यंगचित्र आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे अनेकदा व्यंगचित्रातून विरोधकांवर प्रहार करायचे. त्याच पद्धतीने आता नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. नितेश राणेंनी या व्यंगचित्राला ह्यवाजले की बारा!ह्ण असे शीर्षक दिले आहे. नितेश राणे यांनी हे व्यंगचित्र व्हॉट्सअप स्टेटस म्हणूनही ठेवले आहे. आता नितेश राणेंच्या या व्यंगचित्राला शिवसेनेकडून काय उत्तर दिले जाणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

भोसरी प्रकरणात खडसे,पत्नी आणि जावयाविरोधात ‘ईडी’कडून आरोपपत्र!

News Desk

बैठक-बैठक’ खेळण्याचा दमदार खेळ सुरूच – सामना टीका

News Desk

“बुस्टर डोस मला माहित नाही पण, हा मास्टर ब्लास्टर डोस आमचाच असेल”, राऊतांचा भाजपला टोला

Aprna
महाराष्ट्र

भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी उद्धव-शरद पवार एकत्र

News Desk

मुंबई- शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी दहा दिवसांपूर्वी भेट घेतल्याचे सांगण्यात येत आहे. खूद्द शरद पवार यांनी या वृत्ताला दुजोरा दिला असल्याने राजकीय वतुर्ळात खळबळ उडाली आहे.

या भेटीत दोन्ही नेत्यांदरम्यान राज्यातील सध्याच्या राजकीय स्थितीबाबत चर्चा झाल्याचे पवार यांनी सांगितले. पवार यांच्या निवासस्थानी 10 दिवसांपूर्वी ही भेट झाली. या भेटीची राजकीय वतुर्ळात मात्र वेगवेगळी चर्चा सुरु झाली आहे.

काँग्रेसला रामराम केलेले आणि स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी एनडीएला पाठिंबा दिला आहे. तसेच सरकारमध्ये ते सहभागी होण्याचे संकेत मिळत आहे. त्यामुळे राज्यातील घडामोडींना वेग आला आहे. राणेंचा सत्तेत सहभाग झाला तर शिवसेनेची कोंडी करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. मात्र, भाजप राणेंना मंत्रीमंडळात स्थान देण्याला शिवसेनेचा विरोध आहे. तसेच भाजपही शिवसेनेला पाण्यात पाहण्याचा प्रयत्न आहे. शिवसेना सत्तेत राहूनही भाजपविरोधात आंदोलन करत आहे. ते भाजपला सहन होत नाही. त्यामुळे भाजप आणि शिवसेनेतील दूरावा दिवसागणिक वाढत आहे. त्यामुळे उद्धव-ठाकरे यांच्या भेटीला महत्व आले आहे.

गेल्याच आठवड्यात तृणमूल काँग्रेसच्या नेत्या आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यामुळे भाजपला कोंडीत पकडण्यासाठी शिवसेनेचा प्रयत्न असल्याचे म्हटले जात आहे. राणे सत्तेत असतील तर शिवसेना सत्तेत राहणार नाही, असे संकेत आहे. तसेच उद्धव ठाकरे यांची सरकारमध्ये राहण्याची मानसिकता नाही, त्यामुळे या भेटीमुळे राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे.

Related posts

…तर ‘अनिल देशमुख’ करु, ‘भुजबळ’ करु या भाजपच्या धमक्या म्हणजे गुंड, राडा प्रवृत्ती !

News Desk

कर्जमाफीऐवजी शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करा – आ. प्रशांत बंब यांची मागणी  

News Desk

दिवाळीत लोडशेडींगला सुट्टी 

News Desk