HW Marathi
महाराष्ट्र मुंबई राजकारण

शेतकरी आंदोलनाला ‘पब्लिसिटी स्टंट’ म्हणणाऱ्या आठवलेंनी शेतकऱ्यांची माफी मागावी,राष्ट्रवादीच्या मागणी!

मुंबई| मुंबई येथील आजाद मैदान येथे होणाऱ्या शेतकरी आंदोलनाला पब्लिसिटी स्टंट असं म्हणत रामदास आठवले यांनी वाद ओढवून घेतला आहे. शेतकरी आंदोलनाला ‘पब्लिसिटी स्टंट’ म्हणणाऱ्या आठवलेंनी शेतकऱ्यांची माफी मागावी अशी मानवी राष्ट्रवादीने केली आहे.रामदास आठवले यांनी शेतकऱ्यांचा अपमान केला आहे,संपूर्ण देशातल्या शेतकऱ्यांनी नवीन कृषी कायदा तातडीने रद्द व्हावा या दृष्टीने गेल्या साडे तीन महिन्यापासून आंदोलन सुरू केले.

हजारोंच्या संख्येने शेतकरी बांधव दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडून बसलेले आहेत. भारत सरकार व शेतकरी नेत्यांमध्ये झालेल्या चर्चेच्या सर्व फेऱ्या हे निष्फळ ठरल्या आणि मोदी सरकार हा कृषी कायदा मागे घेण्यास तयार नाही असे चित्र निर्माण झालेले असताना केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी शेतकरी मोर्चाला पब्लिसिटी स्टंट म्हणत शेतकर्‍यांचा अपमान केलेला आहे त्यामुळे त्यांनी माफी मागितली पाहिजे असं राष्ट्रवादीने म्हटलं आहे.

Related posts

मुंबईत संपूर्ण लॉकडाऊन हवा – महापौर किशोरी पेडणेकर

News Desk

राष्ट्रवादीत आणखी एका मोठ्या नेत्याची एन्ट्री!

News Desk

आरोग्यमंत्र्यांनी दिली ‘गुडन्यूज’, ३४ जणांना दिला डिस्चार्ज

rasika shinde