बीड – जिल्ह्यातील वंरगलवाडी येथे एका २८ वर्षीय महिलेची नग्न धिंड काढण्यात आली. याप्रकरणी आठ जणांना अटक करण्यात आली आहे. भावाला अनैतिक संबंधांसाठी मदत केल्याच्या संशयावरून गेल्या शुक्रवारी घृणास्पद प्रकार घडला.
आरोपींच्या कुटुंबातील एका महिलेशी पीडितेच्या भावाचे अनैतिक संबंध होते. त्यासाठी पीडिता मदत करीत असल्याच्या संशयावरून २ ऑगस्ट रोजी तिला मारहाण करण्यात आली. संबंधित महिला आणि तिच्या पतीला गावासमोर माफी मागण्यास भाग पाडण्यात आले. त्यानंतर पीडितेचा पती ४ ऑगस्ट रोजी बाहेरगावी गेला असताना पाच महिला आणि चार पुरुष पुन्हा तिच्या घरी गेले आणि तिला चपलांनी मारहाण करून तिची गावातून विवस्त्रावस्थेत धिंड काढण्यात आली.
याप्रकरणी गेवराई तालुक्यातील चकलांबा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. मारुती सातळे, बबन सातळे, संजय इंगोले, कुंता इंगोले, लंका सातळे, रेखा इंगोले आणि झुंबर दाताळ अशी गुन्हा नोंदविण्यात आलेल्यांची नावे आहेत.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.