HW News Marathi
Covid-19

राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा आज ४७, १९० वर

मुंबई | देशातील अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा सर्वाधिक आहे. गेल्या २४ तासांत राज्यात तब्बल २,६०८ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा आज (२३ मे) ४७, १९० वर पोहोचला आहे. तर गेल्या २४ तासांत राज्यात कोरोनामुळे ६० जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. राज्यासाठी एक अत्यंत दिलासादायक बाबा अशी कि, गेल्या २४ तासांत राज्यात ८२१ जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोनामुक्त झालेल्यांचा एकूण आकडा आता १३, ४०४ इतका झाला आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याबाबतची अधिकृत माहिती दिली आहे. तर गेल्या २४ तासांत देशात तब्बल ६,६५४ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. त्यामुळे, देशातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा आता १ लाख २५ हजार १०१ वर पोहोचला आहे.

राज्यातील जिल्हा व मनपानिहाय रुग्णांचा आतापर्यंतचा तपशील: (कंसात मृत्यूंची आकडेवारी)

मुंबई महानगरपालिका: २८,८१७ (९४९)

ठाणे: ३९४ (४)

ठाणे मनपा: २४४०५ (३५)

नवी मुंबई मनपा: १७७८ (२९)

कल्याण डोंबिवली मनपा: ७८४ (७)

उल्हासनगर मनपा: १४५ (३)

भिवंडी निजामपूर मनपा: ८२ (३)

मीरा भाईंदर मनपा: ४४२ (४)

पालघर:१११ (३)

वसई विरार मनपा: ४९९ (१५)

रायगड: ३२१ (५)

पनवेल मनपा: २९५ (१२)

ठाणे मंडळ एकूण: ३६,१७३ (१०६९)

नाशिक: ११५

नाशिक मनपा: १०५ (२)

मालेगाव मनपा: ७११ (४४)

अहमदनगर: ५३ (५)

अहमदनगर मनपा: १९

धुळे: १७ (३)

धुळे मनपा: ८० (६)

जळगाव: २९० (३६)

जळगाव मनपा: ११३ (५)

नंदूरबार: ३२ (२)

नाशिक मंडळ एकूण: १५३५ (१०३)

पुणे: ३१२ (५)

पुणे मनपा: ४८०५ (२४५)

पिंपरी चिंचवड मनपा: २३० (७)

सोलापूर: २२ (१)

सोलापूर मनपा: ५४५ (३४)

सातारा: २०४ (५)

पुणे मंडळ एकूण: ६११८ (२९७)

कोल्हापूर:२०६ (१)

कोल्हापूर मनपा: २३

सांगली: ६३

सांगली मिरज कुपवाड मनपा: ११ (१)

सिंधुदुर्ग: १०

रत्नागिरी: १४२ (३)

कोल्हापूर मंडळ एकूण: ४५५ (५)

औरंगाबाद:२२

औरंगाबाद मनपा: ११९७ (४२)

जालना: ५४

हिंगोली: ११२

परभणी: १७ (१)

परभणी मनपा: ५

औरंगाबाद मंडळ एकूण: १४०७ (४३)

लातूर: ६४ (२)

लातूर मनपा: ३

उस्मानाबाद: २९

बीड: २६

नांदेड: १५

नांदेड मनपा: ८५ (५)

लातूर मंडळ एकूण: २२० (७)

अकोला: ३१ (२)

अकोला मनपा: ३४२ (१५)

अमरावती: १३ (२)

अमरावती मनपा: १४३ (१२)

यवतमाळ: ११३

बुलढाणा: ३९ (३)

वाशिम: ८

अकोला मंडळ एकूण:६८९ (३४)

नागपूर: ३

नागपूर मनपा: ४६२ (७)

वर्धा: ३ (१)

भंडारा: ९

गोंदिया: ३९

चंद्रपूर: ८

चंद्रपूर मनपा: ७

गडचिरोली: १३

नागपूर मंडळ एकूण: ५४५ (८)

इतर राज्ये: ४८ (११)

एकूण: ४७ हजार १९० (१५७७)

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ठाकरे सरकारचं ‘मुंबई मॉडेल’ खोटं, नितेश राणेंचा गंभीर आरोप

News Desk

डोनाल्ड ट्रम्प यांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार ‘कोरोना पॉझिटिव्ह’ 

News Desk

राज्य सरकार लवकरच पॅकेज जाहीर करणार | अजित पवार

News Desk