HW News Marathi
Covid-19

जगभरातील कोरोनाबाधितांचा आकडा ५० लाखांच्या जवळ

नवी दिल्ली | संपूर्ण जगाला कोरोनाचा जबरदस्त विळखा आहे. जगातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा आता 50 लाखांच्या अगदी जवळ पोहोचला आहे. आज (२० मे) सकाळपर्यंत मिळालेल्या माहितीनुसार जगभरातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा ४९ लाखांच्या पुढे गेला आहे. तर कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या सव्वातीन लाखांच्या जवळपास जाऊन पोहोचली आहे. नुकताच भारतातही कोरोनाबाधितांचा आकडा १ लाखाच्या पार गेला आहे. सद्यस्थितीत देशातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा १०६,७५० वर पोहोचला आहे कोरोनाबाधितांच्या आकड्याचा विचार करता भारत संपूर्ण जगात ११ व्या स्थानी आहे. दरम्यान, भारतात एकीकडे कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असला तरीही इतर देशांच्या तुलनेत आपला मृत्युदर कमी आहे ही एक दिलासादायक बाब.

जगभरातील २१२ देशांना सध्या कोरोनाचा विळखा आहे. तर ७२% कोरोनाबाधित हे फक्त १० देशांमध्ये आहेत. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार आतापर्यंत जगभरात कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंचा आकडा 324,889 वर पोहोचली आहे. मात्र, दिलासादायक बाब अशी कि जगभरात आतापर्यंत 1,958,441 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोनाची सर्वाधिक झळ अमेरिकेला बसली आहे. जगात जवळपास एक तृतीयांश कोरोनाबाधित आहेत तर त्यांपैकी एक चतुर्थांश मृत्यू फक्त अमेरिकेत झाले आहेत. जगभरातील हा कोरोनाबाधितांचा आकडा चिंताजनक असला तरीही प्रत्येक देश ह्यातून बाहेर पडण्यासाठी कसोशीने प्रयत्न करत आहे. दरम्यान, देशातील कोणकोणत्या १० देशांमध्ये कोरोनाचा सर्वाधिक कहर सुरु आहे जाणून घेऊया.

देश कोरोनाबाधित मृत्यू

अमेरिका 1,570,583 93,533

स्पेन 278,803 27,778

रशिया 299,941 2,837

यूके 248,818 35,341

इटली 226,699 32,169

ब्राझील 271,885 17,983

फ्रांस 180,809 28,022

जर्मनी 177,827 8,193

टर्की 151,615 4,199

इरान 124,603 7,119

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अनेक दिवसांनी राज्यात केवळ १० हजार रुग्ण आढळले

News Desk

नवनीत राणा यांना श्वसनाचे त्रास होऊ लागल्यानंतर मुंबईत हलवले

News Desk

ठाण्यातील १६ भागांमध्ये आजपासून ३१ मार्चपर्यंत कडक लॉकडाऊन

News Desk