HW News Marathi
महाराष्ट्र

राणा दाम्पत्यांनी ‘या’ कारणामुळे ‘मातोश्री’वर जाण्याचा निर्णय घेतला मागे

मुंबई। आमदार रवी राणा आणि त्यांची पत्नी खासदार नवनीत राणा यांनी मातोश्री समोर हनुमान चालिसा पठाण करण्याच्या दोन दिवसाच्या हाई वोल्टेज ड्रामा आता ब्रेक लागला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौ-याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री समोर हनुमान चालिसा पठाण करण्यासाठी जाण्याचा निर्णय त्यांनी मागे घेतल्याची माहिती राणा दाम्पत्यांनी आज (२३ एप्रिल) पत्रकार परिषद घेऊन केली आहे.

मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्री येथे २३ एप्रिल रोजी हनुमान चालिसा पठाण करणार असल्याची घोषणा केली होती. परंतु, आज पत्रकार परिषद घेऊन उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबई दौरा आहे. पंतप्रधानांचा दौरा रद्द होऊ नये, आणि राज्यातील जनता आणि पोलिसांना त्रास होऊन नये म्हणून हनुमान चालिसा पठाण करण्याचे आंदोलन आम्ही थांबवित आहोत, अशी मागणी राणा दाम्पत्यांनी पत्रकार परिषद घेऊन केली आहे.

मुंबईतील दोन दिवसीय हाई वोल्टेज ड्रामा

मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्री येथे २३ एप्रिल रोजी हनुमान चालिसा पठाण करणार असल्याची घोषणा केली होती. यानुसार, राणा दाम्पत्ये एक दिवस आधी म्हणजे काल (२२ एप्रिल) पोलिसांची नजर चुकवून मुंबई दाखल झाले. यानंतर मुंबई पोलिसांनी राणा दाम्पत्यांचा शोध घेतला. हे दाम्पत्य त्याच्या खार निवासस्थान होते. यानंतर दाम्पत्यांनी पत्रकार परिषद घेऊन आज मातोश्री वर जाणार असल्याची घोषणा केली. यानंतर शिवसैनिकांनी मातोश्री समोर ठिय्या मांडून बसले तर बाकी शिवसैनिकांनी राणा दाम्पत्यांच्या खार निवासस्थान ‘बजरंग बली की जय’ अशा घोषणा देत होते. आज सकाळी शिवसैनिकांनी त्यांच्या निवासस्थान अडवून ठेवल्यामुळे त्यांनी मातोश्रीला जाता आले नाही. 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कंगना फक्त कारण आहे, बेबी पेंग्विनला वाचवायचे आहे !

News Desk

पोहरादेवी जगदंबा देवीचे महंत कबिरदास महाराज यांच्यासह १९ जणांना कोरोनाची लागण  

News Desk

“पाठीत खंजीर खुपसणाऱ्या शिवसेनेला धडा शिकवण्यासाठी मुंबई महापालिका जिंका” – चंद्रकांत पाटील

News Desk