नवी दिल्ली | आषाढी एकादशीनिमित्त सुमारे १० लाखांहून अधिक वारकर्यांच्या मांदियाळीने पंढरी नगरी अक्षरश: दुमदुमून गेली आहे. आषाढी एकादशीनिमित्ताने राज्यभरातून विठूराया आणि रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी भक्तगण पंढरपुरात दाखल झाले आहेत. राज्यभरात आषाढी एकादशीनिमित्ताने उत्सहाचा वातावरण पहायला मिळाले आहे. या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बिग बी अमिताभ बच्चन यांनी मराठीतून शुभेच्छा दिल्या आहेत.
सभी देशवासियों को आषाढ़ी एकादशी और चातुर्मास की हार्दिक शुभकामनाएं।
आषाढी एकादशीच्या सर्व नागरिकांना मन:पूर्वक शुभेच्छा! विठुराया आणि रखुमाईच्या कृपेने सर्व नागरिकांना सुख, समृद्धी आणि आरोग्य प्राप्त व्हावे, ही माझी विनम्र प्रार्थना!
— Narendra Modi (@narendramodi) July 12, 2019
या औचित्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीत ट्वीट करत, “आषाढी एकादशीच्या सर्व नागरिकांना मन:पूर्वक शुभेच्छा! विठुराया आणि रखुमाईच्या कृपेने सर्व नागरिकांना सुख, समृद्धी आणि आरोग्य प्राप्त व्हावे, ही माझी विनम्र प्रार्थना!”, तसेच मोदींनी पंढरपूरच्या विठ्ठलाचा महिमा आणि वारीचा एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे.
T 3224 – टाळ वाजे, मृदुंग वाजे
वाजे हरीचा विणा ||माऊली निघाले पंढरपूरा
मुखाने विठ्ठल विठ्ठल बोला ||||जय जय राम कृष्ण हरी||
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा…!
Jai hari Vitthal !! 🙏🙏🙏🙏🙏🙏 pic.twitter.com/f0aLShtsjR— Amitabh Bachchan (@SrBachchan) July 12, 2019
मोदींपाठोपात बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी देखील मराठीतून आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अमिताभ यांनी म्हटले की, “टाळ वाजे, मृदुंग वाजे, वाजे हरीचा विणा, माऊली निघाले पंढरपूरा, मुखाने विठ्ठल विठ्ठल बोला, जय जय राम कृष्ण हरी, आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा…! , ट्वीट केले आहे.
T 3224 – Aaj Ashadhi Ekadas ke pavan avsar per Aapko Aur aapke pure parivar ko anek anek Shubhkamnaye..Vitthal -Rakhumai ji ki krupa aap sab per sada bani rahe yahi prarthna.
आषाढी एकादशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा…
चन्द्रभागेच्यातीरी उभा मंदारी, तो पहा विटेवरी | 🙏🙏🙏🙏 pic.twitter.com/UaSBz2gbNu— Amitabh Bachchan (@SrBachchan) July 12, 2019
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.