HW News Marathi
महाराष्ट्र

नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापुजा

मुंबई। आषाढी एकादशी निमित्ताने सालाबादप्रमाणे महराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विठुरायाची महापुजा पार पडली. मुख्यमंत्री आणि त्यांच्या पत्नी लता शिंदे यांच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात आज (१० जुलै) पहाटे ३ वाजून १० मिनिटाने ही हस्ते शासकीय महापुजा संपन्न झाली.
दरम्यान, पंढरपुरात नगरपालिका आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर विठुरायाच्या शासकीय महापुजेसाठी मुख्यमंत्र्यांना निवडणूक आयोगाने काही अटी व शर्तीवर पुजेची परवानगी दिली होती. आणि मुख्यमंत्र्यांनी सर्व नियमाचे पालन करून महापुजा केली.
कोरोनामुळे गेली दोन वर्ष भाविक आणि वारकऱ्यांना विठुरायाचे थेट दर्शन घेता येत नव्हते. यंदाच्या वर्षी वारकऱ्यांना डोळे भरून विठुरायाचे दर्शन घेता आले. या वर्षी वारीत लाखोंच्या संख्येने गर्दी केली होती.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाची थेट कर्ज योजनेची मर्यादा १ लाख रूपयांपर्यंत वाढवली

Aprna

भीमा-कोरेगाव चौकशी आयोगाकडे शरद पवारांना समन्स बजावण्याची मागणी

swarit

वाटेल ती किंमत मोजू,पण मराठा समाजाचे सगळे प्रश्न सोडवू, हसन मुश्रीफांचा शब्द

News Desk