HW News Marathi
महाराष्ट्र

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त दगडूशेठ गणपतीला तब्बल 61 किलोंचा मोदक…..!

पुणे। आगामी काळात होणाऱ्या पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पुण्यात भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जोरदार ‘ होर्डिंग वॉर ‘ बघायला मिळाले होते. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मंगळवारी ( 27 जुलै ) वाढदिवस आहे. याच पार्श्वभूमीवर पुणे शिवसेनेच्यावतीने प्रसिद्ध श्रीमंत पतीला तब्बल 61 किलोंचा मोदक अर्पण करण्यात आला आहे.

गणपतीला तब्बल 61 किलोंचा मोदक

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत पुण्यात विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गो – हे यांनी शिवसेना कार्यकर्त्यांसह पुण्यातील प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ गणपतीला तब्बल 61 किलोंचा मोदक अर्पण केला आहे. यावेळी गोऱ्हे यांनी शिवसेना कार्यकर्त्यांसह महाआरती देखील केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 61 वर्षे पूर्ण केल्याबद्दल शिवसेना पुणे शहराच्यावतीने त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या, त्यांना दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्य लाभाव, तसेच कोरोना व नैसर्गिक आपत्तीविरूद्ध लढण्याचे बळ मिळावे आणि पीडितांची सेवा करण्याचा आशीर्वाद मिळावा अशी प्रार्थना देखील करण्यात आली.

 

 

हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न

शिवसेना पुणे शहराच्या वतीने उद्धव ठाकरे यांच्या 61 व्या वर्षात पदार्पण केल्याबद्दल त्यांना आम्ही शुभेच्छा देतो, आभार मानतो आणि देवाचे अभिनंदन करतो. हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण केलेलं आहे. भयंकर अशा करोना रोगापासून ते जगाला, महाराष्ट्राला, पुण्याला, मुंबईला सर्वांना कोरोनापासून मुक्ती मिळावी.

कोरोनाच्या परिस्थितीमधून आम्हाला मार्ग मिळावा

अतिवृष्टीमुळे जे दगावले गेले आहेत. त्यांच्या आत्म्यास शांती मिळावी. सर्व पूरग्रस्तांचे पुनर्वसन व्हावे, या नैसर्गिक आपत्तीमधून सुटका होण्यासाठी जास्तीतजास्त बळ, शक्ती आणि सेवेची संधी उद्धवजी ठाकरे, आदित्य ठाकरे आणि आमच्या सरकारला मिळावी. शिवसेनेला सुरक्षित ठेवून, प्रत्येकाला दीर्घ आयुष्य मिळावं आणि सौ. रश्मी वहिनी यांच सौभाग्य आणि भाग्य या दोन्हीमध्ये वृद्धी व्हावी. त्याच बरोबर श्री गणेश देवा सर्व मंदिरं लवकरात लवकर उघडी होण्याच्या दृष्टीने कोरोनाच्या परिस्थितीमधून आम्हाला मार्ग मिळावा. यासाठी आम्ही हा संकल्प करीत आहोत, अशी प्रार्थना नीलम गोऱ्हे यांनी गणराया चरणी केली. यावेळी माजी आमदार रवींद्र मिर्लेकर,पुणे शहर संपर्कप्रमुख बाळा कदम, शिवसेना शहर प्रमुख संजय मोरे, पुणे महापालिकेतील शिवसेना गटनेते पृथ्वीराज सुतार यांच्यासह आजी माजी नगरसेवक पदाधिकारी उपस्थित होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

औरंगाबादमध्ये २ नवे कोरोना पॉझिटिव्ह, शहराची संख्या २० वर

News Desk

मोदी सरकारने काम करावे, बोलणे व डोलणे कमी करावे !

News Desk

‘इनोव्हेटिव्ह रिजन’ म्हणून कोकणच्या विकासासाठी बांधील – अजित पवार

News Desk