HW News Marathi
महाराष्ट्र

दिवाळीनिमित्त पुणे विभाग दोन विशेष रेल्वे गाड्या सोडणार

पुणे | प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेता दुर्गापूजा व दिवाळीनिमित्त मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने दोन विशेष रेल्वे सोडण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे-हजरत निजामुद्दीन-पुणे आणि पुणे-मंडुआडीह (उत्तरप्रदेश) या दोन विशेष साप्ताहिक रेल्वे सोडण्यात येणार आहेत, अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.

04417 पुणे-हजरत निजामुद्दीन-पुणे साप्ताहिक विशेष रेल्वे 18 ऑक्‍टोबर ते 15 नोव्हेंबरदरम्यान, दर गुरूवारी पुण्यातून पहाटे 5.15 वाजता सुटून हजरत निजामुद्दीन येथे दुसऱ्या दिवशी पहाटे 5.35 वाजता पोहोचेल. तर, परतीच्या प्रवासात 04418 हजरत निजामुद्दीन-पुणे रेल्वे 16 ऑक्‍टोबर ते 13 नोव्हेंबरदरम्यान दर मंगळवारी रात्री 9.35 वाजता हजरत निजामुद्दीन येथून सुटून दुसऱ्या दिवशी पुण्यात रात्री 9.25 वाजता पोहोचेल. त्याचबरोबर पुण्याहून मंडुआडीहकरिता 01455 विशेष रेल्वे दि.

5 ते 26 नोव्हेंबरदरम्यान पुण्यातून दर सोमवारी रात्री 8.20 वाजता सुटून तिसऱ्या दिवशी मंडुआडीह येथे मध्यरात्री 3 वाजता पोहोचेल. तर 01456 विशेष रेल्वे दि. 7 ते 28 नोव्हेंबरदरम्यान मंडुआडीह येथून दर बुधवारी सकाळी 6.30 वाजता सुटून पुण्यात दुसऱ्या दिवशी सकाळी 11.45 वाजता दाखल होणार आहे.

पुणे-निजामुद्दीन या गाडीला लोणावळा, कल्याण, वसई रोड, वापी, सूरत, वडोदरा, रतलाम, कोटा, मथुरा येथे थांबा देण्यात आला आहे. तर, पुणे-मंडुआडीह या गाडीला दौंड, नगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, खांडवा, इटारसी, जबलपूर, कटनी, अलाहबाद येथे थांबा देण्यात येणार आहे. या दोन्ही गाड्यांचे आरक्षण सुरू झाले असून प्रवाशांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सत्ताधारी शिवसेनेची ही धमकी योग्य नाही, आम्ही कंगनाला संरक्षण देऊ !

News Desk

देशभरात मंदिरे सुरू, महाराष्ट्रात बंद, गणरायाने सरकारला सुबुद्धी द्यावी; फडणवीस यांची गणरायाला विनंती!

News Desk

चंद्रकांत खैरे-अब्दुल्ल सत्तार यांच्यातील वाद संपला, सर्व गैरसमज दूर झालेत !

News Desk