HW News Marathi
महाराष्ट्र

विनापरवाना मोटार सायकल रॅली काढल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर आमदार श्वेता महाले म्हणतात, “होय, आम्ही गुन्हेगार…”

बुलढाणा | शिवजयंतीनिमित्त शनिवारी (१९ फेब्रुवारी) बुलढाण्यातील चिखली शहरातून महिलांची एक मोटारसायकल रॅली काढण्यात आली. परंतु या रॅलीच्या माध्यमातून साथरोग नियंत्रण नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी भाजपच्या आमदार श्वेता महाले यांच्यासह सुमारे ३५ जणांवर चिखलीत गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, हा गुन्हा दाखल झाल्यानंतर आता आमदार महाले यांची एक प्रतिक्रिया आली आहे. पोलिसांच्या या कारवाईवर प्रतिक्रिया देताना श्वेता महाले म्हणाल्या कि, “होय, आम्ही गुन्हेगार.”

आमदार श्वेता महाले या प्रकरणी बोलताना म्हणाल्या कि, “अखिल महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त महाराजांना मानाचा मुजरा आणि अभिवादन करण्यासाठी चिखली शहरातून जिजाऊच्या लेकींनी शांततेच्या मार्गाने काढलेल्या बाइक रॅलीमुळे त्या जर गुन्हेगार ठरत असतील तर असे गुन्हे वारंवार करण्यासाठी आम्हीसुद्धा सज्ज आहोत आणि आम्हाला कोणी गुन्हेगार म्हटले तरी त्याची आम्हाला तमा नाही.”

मिळालेल्या माहितीनुसार, १९ फेब्रुवारी रोजी दुपारच्या सुमारास चिखली शहरांमधून महिलांची मोटरसायकल रॅली काढण्यात आली. आमदार श्वेता महाले यांच्यासह अनेक महिला लोकप्रतिनिधी, विविध पक्षांच्या व सामाजिक संघटनांच्या महिला पदाधिकारी या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. मात्र कोरोना प्रोटोकॉलचा आधार घेत चिखली पोलिसांनी या रॅलीला परवानगी नसल्याचे कारण सांगून रॅलीत सहभागी झालेल्या महिलांवर गुन्हे दाखल केले आहेत. विनापरवाना मोटारसायकल व स्कुटी रॅली काढून जिल्हाधिकारी बुलडाणा यांचे जमावबंदी आदेशाचे व महाराष्ट्र शासनाचे कोव्हीड नियमाचे उल्लंघन केल्याचा आरोप संबंधीतांवर पोलिसांनी लावला आहे.”

Related posts

देशमुख तुम्ही दरोडा घालायचा आणि पोलिसांनी तुमचं हार टाकून स्वागत करायचं का? भाजपची टीका!

News Desk

भावना गवळींचे दोन्ही सहकारी ईडीसमोर गैरहजर!

News Desk

‘कोरोनावेग थंडावतोय’, गेल्या २४ तासात ३०,०९३ रुग्ण!

News Desk