HW News Marathi
महाराष्ट्र

स्वातंत्रवीर सावरकरांसाठी एकदिवसीय उपोषण

मुंबई | स्वातंत्रवीर सावरकर यांच्या सन्मानार्थ २०१६ पासून केलेल्या मागण्यांची अद्याप पुर्तता झालेली नाही. या मागण्याचे साधे उत्तरही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी दिलेले नाही . या विसर पडलेल्या मागण्यांची पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांना आठवण करुन देण्यासाठी २०१८ ला स्मरणपत्र दिले होते. परंतु देशासाठी मोलाचे योगदान दिलेल्या स्वातंत्र्यवीर सावकरांच्या कामाचा सरकार दरबारी विसर पडल्याचे चित्र सध्या पहायला मिळत आहे.

मुख्यमंत्र्यांना राष्ट्रभक्तासाठी ना वेळ ना त्यांच्या कार्याचा सन्मान करता येत त्याचसाठी सावरकर जयंतीला एकवेळचे अन्न त्यागून उपोषण (उपवास ) करण्याचे “राष्ट्राभिमानी समितीने” ठरवले आहे. हा निषेध मुख्यमंत्री फडणवीसांना त्या मागणीपत्राचे स्मरण व्हावे यासाठी असणार आहे. सोमवार दिनांक २८ मे २०१८ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ४ पर्यंत स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक शिवाजी पार्क येथे या एक दिवसीय उपोषणाचे आयोजन करण्यात आले आहे.

राष्ट्रभक्त स्वातंत्रवीर सावरकर यांच्या कार्याचा उचित सन्मान होण्यासाठी २०१६ ला ज्ञानदा प्रबोधन संस्थेच्या माध्यमातून राज्य सरकार आणि केंद्र सरकारला निवेदन देण्यात आले होते. पंतप्रधान कार्यालयाकडून या निवेदनाचे उत्तर देण्यात आले परंतु राज्य सरकारला साधे उत्तरही द्यावेसे वाटले नाही म्हणून २०१६ ला पुन्हा एक दिवसीय उपोषण करण्यात आले होते. त्यानंतर सातत्याने याचा पाठपुरावा करण्यात आला यावर्षी २०१८ ला पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री आणि देशाचे पंतप्रधान यांना निवेदनाचे स्मरण व्हावे म्हणून निवेदन पाठविण्यात आले.

सरकारकडे केलेल्या प्रमुख मागण्या

  • स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या नावाने राष्ट्रीय शौर्य पुरस्कार देण्यात यावा.
  • सावरकरी जयंती आणि आत्मार्पणदिनाला शासकीय दर्जा सरकारने द्यावा मात्र सुट्टी न देता तो दिवस साजरा करण्याचे आदेश द्यावे.
  • देशातील गोरगरिबांसाठी / गरजूवंतांसाठी सावरकरांच्या नावाने सरकारी योजना सुरु करणे
  • शालेय पाठ्यक्रमात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनावर सविस्तर शिकवले जावेत
  • शाळा महाविद्यालय आणि सर्व शासकीय कार्यालयात सावरकरांची तसबीर लावणे सक्तीचे करावे
  • मुंबईतील वांद्रे – वरळी सागरी सेतूचे सावरकरांचे नाव द्यायला हवे होते त्याला काँग्रेस सरकारने स्व.राजीव गांधींचे दिले ते पुन्हा बदलून सावरकरांचे द्यावे जर योजनांची नावे बदलू शकता मग सेतूचे का नाही.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भीमा कोरेगाव प्रकरण – राष्ट्रीय तपास यंत्रणेने ८ जणांविरोधात आरोपपत्र दाखल केले

News Desk

अनिल देशमुखांच्या पत्नीला आता ED चं समन्स, चौकशीसाठी लावावी लागणार हजेरी

News Desk

कॉंग्रेसच्या स्वबळाच्या नाऱ्याने सेना-राष्ट्रवादी हलली, दरेकरांचा घणाघात

News Desk