HW News Marathi
महाराष्ट्र

एससी-एसटी आरक्षण मुदत वाढीसाठी आज एकदिवसीय विशेष अधिवेशन

मुंबई | राज्य विधीमंडळाचे आज विशेष आधिवेश बोलविण्यात आले आहे. अनुसूचित जाती-अनुसूचित जमाती आरक्षण मुदतवाढीसाठी आज (८ जानेवारी) एकदिवसीय आधिवेशन बोलविण्यात आले आहे. यासाठी सभागृहात आज सर्व आमदार एकवटले आहेत. यावेळी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी विधीमंडळात अभिभाषण केले. राज्यपालांनी अभिभाषणाच्या सुरुवतीला सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. यानंतर राज्यपाल अभिभाषणात म्हटले की, सर्व घटकांच्या विकासासाठी राज्य सरकार कटीबद्ध आहे

राज्यपाल पुढे म्हणले की, सरकारकडून सरकारकडून शेतकऱ्यांना २ लाखापर्यंत कर्जमाफी देण्यात आली असून शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकार सर्व निर्णय घेईल. त्याचबरोबर महिलांच्या सुरक्षेसाठी सरकार वचनबद्ध असल्याचे देखील राज्यपालांनी म्हटले. दरम्यान, सरकारच्या वतीने शिवभोजन योजना, बळीराजा साह्य योजन राबविण्यात येणार आहे. तर मराठी रंगभूमीला १७५ वर्षे झाल्यामुळे यंदाचे वर्ष हे मराठी रंगभूमीसाठी खास असल्याने मुंबईत मुंबईत मराठी रंगभूमीचा इतिहास सांगणारे संग्रहालय उभारणार, असे राज्यपालांनी त्यांच्या अभिभाषणात सांगितले. सरकार तीर्थक्षेत्र स्थळांचा विकास कार्यक्रम हाती घेणार, असल्याची माहिती देखील राज्यपालांनी दिली. महाराष्ट्र सर्वच क्षेत्रांमध्ये प्रगतीपथावर असल्याचे देखील राज्यपालांनी त्यांच्या भाषणात नमुद केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देवस्थांनी देखील लावले टाळे

swarit

“अपक्ष म्हणून राज्यसभेची निवडणूक लढणार, ” संभाजीराजेंची मोठी घोषणा

Aprna

मी पोकळ धमक्या देत नाही, मी शिवसैनिक आहे अ‍ॅक्शनवाला माणूस !

News Desk