HW Marathi
महाराष्ट्र राजकारण

मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांचे एका महिन्याचे वेतन पुरग्रस्तांच्या मदतीसाठी

मुंबई | राज्यात झालेल्या मुसळधार पावसाचा सर्वाधिक फटका बसलेल्या सांगली, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातील सामान्य नागरिकांचे प्रचंड हाल झाले आहेत. राज्यासह संपूर्ण देशभरातील विविध क्षेत्रांतून, विविध विभागातून या पूरग्रस्तांसाठी मदतीचा ओघ सुरु आहे. अनेक राजकीय पक्षांनी देखील पूरग्रस्तांना मोठ्या प्रमाणात मदत देऊ केली आहे. याच पार्श्वभूमीवर आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे सर्व मंत्री त्यांचा एक महिन्याचा पगार पूरग्रस्तांना मदत म्हणून देणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.

आज (१३ ऑगस्ट) पार पडलेल्या फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत या निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेकडून देखील अशाच प्रकारचा निर्णय घेण्यात आला होता. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या सर्व आमदार, खासदारांनी राज्यातील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी आपले एका महिन्याचे वेतन देण्याचा निर्णय घेतला होता. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांच्या यात्रांना सुरुवात झाली होती. मात्र,राज्यातील पुरस्थितीच्या पार्श्वभूमीवर या सर्वच राजकीय पक्षांनी आपल्या यात्रा देखील रद्द केल्या. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्र्यांची स्थगित करण्यात आलेली ‘महाजनादेश यात्रा’ १७ ऑगस्टपासून सुरु करण्यात येणार आहे.

Related posts

मंत्रालयातील सुसज्ज स्टुडिओचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन         

News Desk

आता मराठ्यांच्या गनिमी कावा आंदोलन

News Desk

काही शरम असेल तर महापौर, मनपा आयुक्तांची हकालपट्टी करा !

News Desk