HW News Marathi
महाराष्ट्र

शिवसेनेचा आणखी एक नेता ईडीच्या रडारवर

मुंबई | राज्याच्या राजकारणात सध्या ईडी चौकशीचे वारे वाहू लागले आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना नोटीस आली, चौकशी झाली. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरी देखील धाड पडली. त्यानंतर आता आणखी एक नेता ईडीच्या रडारवर असल्याचे समोर येत आहे. पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी संजय राऊत यांच्यापाठोपाठ शिवसेनेचा आणखी एक नेता सक्तवसुली संचलनालयाच्या रडारवर असल्याची माहिती समोर आली आहे.

हा नेता शिवसेनेचा माजी खासदार असून अंडरवर्ल्डशी संबंध असलेल्या एका स्थानिक नेत्याचा नातेवाईक असल्याचे सांगितले जाते. हाऊसिंग डेव्हलपमेंट इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड (एचडीआयएल) आणी PMC बँकेत झालेल्या आर्थिक व्यवहारप्रकरणी PMC Bank Fraud) या नेत्याची ईडीकडून चौकशी होण्याची शक्यता असल्याचे वृत्त ‘टाईम्स ऑफ इंडिया’ने दिले आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी एक व्हिडिओ पोस्ट करत राऊत यांच्यावर टिका केली आहे

सूत्रांच्या माहितीनुसार, एचडीआयएल PMC बँकेत घोटाळा करुन मिळवलेल्या निधीचा मोठा हिस्सा या राजकीय नेत्याला मिळाला आहे. त्यामुळे ईडीकडून आता या शिवसेना नेत्याची झाडाझडती घेतली जाणार असल्याचे सांगितले जाते. याच प्रकरणात काल (४ जानेवारी) खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांची ईडीकडून चार तास चौकशी करण्यात आली. प्रवीण राऊत हे पंजाब-महाराष्ट्र सहकारी बँक (पीएमसी) घोटाळ्यातील आरोपी आहेत. प्रवीण राऊत यांच्याशी संजय व वर्षा राऊत यांचे आर्थिक संबंध असून, त्यांचाही या घोटाळ्यात सहभाग असल्याचा ईडीला संशय आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात २४ ते ४८ तासात जोरदार पावसाची शक्यता

News Desk

एसटी कर्मचारी मध्यरात्रीपासून संपावर

News Desk

कोरोना वाढतोय, मास्क वापरा! – मुख्यमंत्री

Aprna