अकोला | जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूने अखेर आज (७ एप्रिल) अकोल्यातही शिरकाव केला. अकोला जिल्ह्यातील एका रुग्णाला कोरोना विषाणूची बाधा झाली असून,त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा माहिती कार्यालयाकडून देण्यात आली. सदर इमसाचा अहवाल प्राप्त झाल्याचे जिल्हा माहिती कार्यालयाने म्हटले आहे. एकीकडे राज्यात सर्वत्र कोरोनाचे रुग्ण आढळून येत असताना, अकोला जिल्ह्यात मात्र आतापर्यंत एकही रुग्ण आढळला नव्हता.अखेर आज एका रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
सविस्तर वृत्त लवकरच…