मुंबई | देशात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव असला तरी बरे होणाऱ्यांचे प्रमाणही वाढत आहे. देशात आणि राज्यात अनलॉक प्रक्रिया सुरू झाली आहे, तर राज्यात मिशेन बिगेन अगेनदेखील सुरू झाले आहे. सध्या लॉकडाऊनचे काही नियम शिथील करण्यात आले आहेत. अतिशय कमी लोकांच्या उपस्थित चित्रीकरण करण्याची देखील मुभा देण्यात आली आहे. कर्जत येथील एन.डी.स्टुडिओत एका वेबसिरिजच्या चित्रीकरणाला २ महिन्यांपूर्वीच सुरुवात झाली होती. चित्रीकरणाला सुरुवात झाली असली, तर अद्यापही थेअटर व सिनेमागृहांना परवानगी नाही. त्यामुळे एकपडदा थिएटर मालकांनी खासदार सुप्रिया सुळेंची भेट घेत काही मागण्या केल्या आहेत.
यामध्ये एकपडदा थियटरचालकांच्या विविध मागण्यांचा समावेश आहे. @CMOMaharashtra आपणास नम्र विनंती आहे की,कृपया एकपडदा थिएटरचालकांच्या मागण्यांवर सहानुभूतीपूर्वक विचार करुन त्यावर सकारात्मक तोडगा काढावा. धन्यवाद. @OfficeofUT @AmitV_Deshmukh
— Supriya Sule (@supriya_sule) August 25, 2020
‘बॉम्बे डे’ या वेबसिरिजच्या माध्यमातून नितिन चंद्रकांत देसाई यांच्या एन.डी.स्टुडिओत लॉकडाऊन घोषणेच्या तब्बल ८० दिवसांनंतर चित्रीकरणाला सुरुवात केली. राज्य सरकारने चित्रीकरणाला परवागनी दिल्यानंतर आता विविध मालिकांचे व चित्रपटांचे शुटींग सुरू झाले आहे. मात्र, सिनेमागृह आणि मल्टीप्लेक्स थेअटर बंदच आहेत. त्यातच, सप्टेंबर महिन्यातही लॉकडाऊन कायम ठेवण्याचे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिले आहेत. त्यामुळे, चित्रपट, थिएटरमालक आणि तमाशा कलावंतांचे काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.
कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर एकपडदा थिएटर्स बंद आहेत, यामुळे राज्यातील एकपडदा थियटरचालक आर्थिक अडचणीत आले आहेत. ती पुन्हा सुरु करावीत या मागणीचे निवेदन सिनेमा ओनर्स अँड एक्झिबिटर्स असोसिएशनचे अध्यक्ष व फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाचे उपाध्यक्ष नितीन दातार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांना दिले आहे. यामध्ये एकपडदा थियटरचालकांच्या विविध मागण्यांचा समावेश आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीएकपडदा थिएटरचालकांच्या मागण्यांवर सहानुभूतीपूर्वक विचार करुन त्यावर सकारात्मक तोडगा काढावा, अशी विनंती सुप्रिया सुळे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्याकडे केली आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.