HW News Marathi
Covid-19

नुकत्याच ‘कोरोना’मुक्त झालेल्या लातूरमध्ये पुन्हा कोरोनाचा शिरकाव

मुंबई | राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे. एकीकडे कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असला तरीही प्रशासनाच्या चांगल्या कामामुळे अनेक जिल्हे कोरोनमुक्त झाले आहेत. राज्यातील अशाच कोरोनामुक्त जिल्ह्यांच्या यादीत अगदी काही तासांपूर्वीपर्यंत लातूर जिल्ह्याचा देखील समावेश होत होता. मात्र, आता पुन्हा एकदा लातूर जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. गुजरातहून लातूरपर्यंत प्रवास केलेल्या एका महिलेचा कोरोना तपासणीचा कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. सध्या ही महिला उदगीरच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहे. धक्कादायक म्हणजे लॉकडाऊनच्या काळात या महिलेने एका वाहनाची मदत घेत हा प्रवास केला असून लातूरमध्ये आल्यानंतर आपल्या या प्रवासाबाबतची माहिती देखील या महिलेने लपवून ठेवल्याचे समोर आले आहे. मात्र, प्रशासनाच्या सजगतेमुळे या महिलेला शोधून काढण्यात यश आले. त्यानंतर या महिलेची कोरोनाची चाचणी करण्यात आली व ही महिला कोरोनाबाधित असल्याचे समोर आले.

सविस्तर वृत्त लवकरच…

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘या’ व्हिडिओमुळे भाजप-काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोप

News Desk

पडळकरांची टीका अन् फडणवीसांच्या ‘त्या’ दाव्यावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

News Desk

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींचा चीनला स्पष्ट इशारा

News Desk