HW News Marathi
महाराष्ट्र

नाशिकच्या कांद्या व्यापाऱ्यावर आयकर विभागाचे छापे, कांद्याचे दर पन्नास टक्क्यांनी घसरले

नाशिक- नफेखोरी करणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील कांदा व्यापाऱ्यावर शेकडो आयकर अधिकाऱ्यांनी एकत्रित छापे टाकून खळबळ उडवून दिली आहे. या प्रकारामुळे कांदा व्यवहार ठप्प झाला आहे. तसेच कांद्याचे दर पन्नास टक्क्यांनी घसरले आहेत. कांद्याची साठेबाजी आणि त्यातून होणारी भाववाढ रोखण्यासाठी जिल्ह्यातील कांदा व्यापाऱ्यांवर प्राप्तिकर विभागाने छापे टाकल्याचे सांगितले जात आहे. नाशिकमधील व्यापाऱ्यांनी कांद्यांचा साठा केल्याचा संशय असल्याने पिंपळगाव, लासलगाव, कळवण, उमराणा, येवला, चांदवड येथील कांदा व्यापाऱ्यांवर आयकर विभागाने कारवाई करीत घरे, कार्यालये आणि गोदामांची झाडाझडती घेतली होती. शुक्रवारी दुसऱ्या दिवशी देखील या सर्व ठिकाणी चौकशी व तपासणी सुरूच असल्याचे सांगण्यात आले. कांदा व्यापाऱ्यांच्या महिन्याभरातील खरेदी-विक्री व्यवहारांची आयकर विभाग चौकशी करून व्यापाऱ्यांच्या कार्यालयांतील महत्त्वाची कागदपत्रे अधिकाऱ्यांनी जप्त केल्याची चर्चा आहे. नाशिक जिल्ह्यात आशिया खंडातील सर्वात मोठी कांदा बाजारपेठ आहे. कांद्याचे विक्रमी उत्पादन झाल्यानंतर भाव पाडणे, कांद्याचा साठवणूक करून दर वाढवण्यासारखे प्रकार या ठिकाणी वारंवार घडत आहेत. त्यातून व्यापारी कोट्यवधी रुपये कमावत आहेत. नोटंबदीच्या काळात जुन्या नोटा खपवून काळ्याचे पांढरे करण्याचा धंदा येथील व्यापाऱ्यांनी केला होता. त्याचीही या धाडीत चौकशी केली जाण्याची शक्यता आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भुजबळ आधी म्हणाले ओबीसींचं नेतृत्व तुम्ही करा, आणि आता थेट फडणवीसांच्या भेटीला

News Desk

अजित पवारांच्या राजीनाम्यानंतर थोड्याच वेळात शरद पवारांची पत्रकार परिषद

News Desk

शासनाने मागासवर्ग आयोगाचे पुनर्गठन करावे, अन्यथा रोषाला सामोरे जावे लागेल – चंद्रकांत पाटील

News Desk