HW Marathi
महाराष्ट्र

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर अनुपस्थित किंवा शून्य गुण 

पुणे | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक विद्यापीठांनी अंतिम वर्षाच्या परीक्षा ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने घेतल्या होत्या. पण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानं घेतलेल्या ऑनलाईन आणि ऑफलाईन परीक्षेच्या निकालात त्रुटी आढळून आल्या आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

अंतिम वर्षाच्या ऑनलाईन आणि ऑफलाईन परीक्षेच्या निकालात त्रुटी आढळून आल्याने आता विद्यापीठाकडून अंतिम वर्ष निकालाची फेरतपासणी करण्यात येणार आहे. तशी माहिती विद्यापीठ प्रशासनाकडून देण्यात आली आहे. परीक्षा देऊनही जवळपास १८ हजार विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर अनुपस्थित किंवा शून्य गुण असं नमूद करण्यात आलं आहे. त्यामुळं विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांच्या निकालाची पुनर्तपासणी करण्यात येत आहे. तशी माहिती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉक्टर महेश काकडे यांनी दिली आहे.

अंतिम वर्षाच्या परीक्षेतील अडचणींबाबत विद्यार्थ्यांकडून १३ हजारांपेक्षा जास्त तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. विद्यार्थ्यांनी नोंदवलेल्या अडचणी दूर करण्याचं काम विद्यापीठाकडून करण्यात येत होतं. परीक्षेदरम्यान लॉगिन न होणं, प्रश्न न दिसणं, आकृत्या न दिसणं, उत्तरपत्रिका सबमिट न होणं, सर्व्हर जाणं अशा अनेक अडचणींचा सामना विद्यार्थ्यांना करावा लागला होता.

Related posts

राज्यात आज १२ हजारांहून अधिक नवे कोरोनाबाधित तर ३०२ मृत्यू

News Desk

६ महिन्यानंतर मुख्यमंत्री घराबाहेर पडले ही ब्रेकिंग न्यूज असेल तर महाराष्ट्रासाठी दुर्दैवच, पडळकरांचा टोला

News Desk

शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांचे किरीट सोमय्यांवर आरोप

News Desk