HW News Marathi
महाराष्ट्र

‘तू देशासाठी किती जीव तोडून काम करतोस हे फक्त मलाच माहितीय’, क्रांतीने शेअर केली खास पोस्ट

मुंबई। मुंबई क्रूझ ड्रग्स प्रकरणी बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याच्या अटकेनंतर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो मुंबईचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे हे प्रचंड चर्चेत आले. आर्यन खानची अटक, ड्रग्स प्रकरण यामुळे सुरुवातीला समीर वानखेडे कर्तव्यदक्ष अधिकारी असल्याचं म्हटलं जाऊ लागलं. मात्र, याप्रकरणी राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी दररोज पत्रकार परिषदांमधून समीर वानखेडेंवर अत्यंत गंभीर आरोप करणं सुरु केलं.अखेर आता एनसीबीने आर्यन खान तपास प्रकरण हे समीर वानखेडेंकडून काढून घेतलं आहे. दरम्यान या सगळ्यात आता समीर वानखेडेंच्या पत्नी क्रांती रेडकर हिने आता एक खास फोटो शेअर केला ज्यासह तिने खास पोस्टही शेअर केली आहे.

अखेर आता एनसीबीने आर्यन खान तपास प्रकरण हे समीर वानखेडेंकडून काढून घेतलं आहे. दरम्यान या सगळ्यात आता समीर वानखेडेंच्या पत्नी क्रांती रेडकर हिने आता एक खास फोटो शेअर केला ज्यासह तिने खास पोस्टही शेअर केली आहे.

https://www.instagram.com/p/CV6CU4jMmq1/?utm_medium=copy_link

पत्नी म्हणून त्यांच्या पाठीशी ठामपणे

या फोटोसोबत शेअर केलेल्या पोस्टमध्ये क्रांतीने असं म्हटलं आहे की, ‘तू देशासाठी किती जीव तोडून काम करतोस हे फक्त मलाच माहिती’ असं म्हणत क्रांतीने आपल्या पतीची पुन्हा एकदा पाठराखण केली आहे. एकीकडे नवाब मलिक यांच्याकडून समीर वानखेडेंवर हल्लाबोल सुरु असताना दुसरीकडे क्रांती रेडकर सातत्याने समीर वानखेडेंची बाजू मांडत होती.समीर वानखेडेंकडून आर्यन खान प्रकरणाचा तपास काढून घेतलेला असताना क्रांतीने पुन्हा एकदा एक फोटो शेअर करुन आपण पत्नी म्हणून त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत हे दाखवून दिलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Maharashtra Budget 2021-22 : समृद्धी महामार्ग, नाशिक-मुंबई मार्गावर मेगा इलेक्ट्रीक चार्जिंग सेंटर उभारणार

News Desk

स्वाभिमानी शेतकरी संघटनेसारख्या बांडगुळांना मी घाबरत नाही

News Desk

RBIने वसंतदादा सहकारी बॅंकेचं लायसन्स केलं रद्द

News Desk