मुंबई | कोरोनामुळे देशात निर्माण झालेल्या गंभीर स्थितीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी वारंवार केंद्रावर टीका करताना दिसून येत आहेत. याच पार्श्वभूमीवर, राहुल गांधींनी आज (१५ जून) थोर शास्त्रज्ञ अल्बर्ट आईन्स्टाईन यांच्या एका वाक्याची आठवण करून देत केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. “अल्बर्ट आईन्स्टाईनने असे म्हटले आहे कि, अज्ञानापेक्षा अहंकार हा सर्वाधिक धोकादायक आहे. हे देशातील लॉकडाऊनने सिद्ध केले आहे”, असे म्हणत राहुल गांधींनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. या ट्विटसोबत राहुल गांधींनी एक ग्राफ देखील शेअर केला आहे. ज्यामध्ये वाढत जाणारा कोरोनाबाधितांच्या मृत्यूचा आकडा तर ढासळत जाणारी देशाची अर्थव्यवस्था दर्शविण्यात आली आहे. दरम्यान, कोरोनाकाळातील मोदी सरकारच्या अनेक निर्णयावर राहुल गांधींनी वेळोवेळी आपली नाराजी व्यक्त केली आहे.
This lock down proves that:
“The only thing more dangerous than ignorance is arrogance.”
Albert Einstein pic.twitter.com/XkykIxsYKI— Rahul Gandhi (@RahulGandhi) June 15, 2020
राहुल गांधींनी यापूर्वी देखील देशात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊन आणि लॉकडाऊन शिथिल करण्याच्या निर्णयावर निशाणा साधला होता. जगभरातील विविध देशांचे उदाहरण देत त्या देशांचे ग्राफ्स ट्विट करत राहुल गांधींनी केंद्र सरकारच्या लॉकडाऊनच्या निर्णयावर निशाणा साधला होता. जगभरातील अन्य देशांमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा कमी झाला तेव्हाच, लॉकडाऊन शिथिल करण्यात आला होता. भारतात मात्र तसे केले गेले नाही. उलट गेल्या काही दिवसांमध्ये देशातील कोरोनाबाधितांचा आकडा सातत्याने मोठ्या संख्येने वाढत असताना केंद्राने लॉकडाऊन शिथिल करण्याचा घेतलेला निर्णय परस्परविरोधी असल्याचे मत त्यावेळी राहुल गांधींनी व्यक्त केले होते. राहुल गांधींनी ग्राफ्सच्या माध्यमातून ही स्थिती समजावण्याचा प्रयत्न केला होता.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.