HW News Marathi
महाराष्ट्र

एलबीएस मार्गावरील उघडे मॅनहोल मुंबईकरांच्या जीवावर बेतण्याची शक्यता !

धनंजय दळवी | गोरेगाव परिसरातील आंबेडकर चौकात तीन दिवसांपूर्वी अडीच वर्षाचा दिव्यांश सिंह नावाचा चिमुरडा उघड्या गटारावरील चेंबरमध्ये पडून वाहून गेला. अद्याप दिव्यांशचा शोध लागलेला नाही. तसेच पावसाळ्यात लोअर परळमधील मॅनहोलमध्ये पडून डॉ. दीपक अमरापूरकर यांचा मृत्यू झाल्यानंतर महापालिकेला जाग आली होती.

या दुर्घटनेनंतर मुंबई महापालिकेने मुंबईतील मॅनहोलला सुरक्षित करण्यावर भर दिला आहे. मात्र झाकणे हलकी असल्यामुळे मुसळधार पावसात पाण्याच्या दाबामुळे बाजूला सरकत असल्याने मॅनहोल उघडे पडत असल्याचे समोर आले आहे. एलबीएस मार्गावरील उघडे पडणारे मॅनहोल मुंबईकरांच्या जीवावर बेतण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही झाकणे त्वरित बदला अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका सईदा खान यांनी पालिका आयुक्त यांच्याकडे केली आहे.

मुंबई महापालिकेकडून पावसापूर्वी शहर व उपनगरातील मॅनहोलला सुरक्षित जाळ्या लावून झाकणे बंद करण्यात येतात. यंदाही पालिकेकडून मॅनहोलला झाकणे बसविण्यात आली आहेत. कुर्ला ते सायन परिसरातील लालबहाद्दूर शास्त्री रस्त्यावरील बसविण्यात आलेल्या मॅनहोलची झाकणे ही वजनाला हलके असल्यामुळे मुसळधार पावसात पाण्याच्या दबावामुळे मॅनहोलच्या बाजूला पडून मॅनहोल उघडी पडत आहे.

लोखंडी झाकणे चोरीला जात असल्याने पालिकेने संपूर्ण एलबीएस रोडवर एफआरपीची झाकणे बसवून घेतली आहेत, पण त्यातील ५० हून अधिक झाकणे हे मिठी लगतच्या पट्ट्याजवळ येतात एकीकडे पाण्याची पातळी आणि दुसरीकडे पावसाच्या पाण्याचा दाब यामुळे ही हलकी झाकणे बाजूला पडत असल्याने रस्त्यावरून चालले धोक्याचे झाले आहे. उघड्या चेंबरची डोकेदुखी कशी दूर करायची, असा प्रश्‍न आता पालिकेला पडला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी माजी आमदार विद्या चव्हाण यांची निवड

Aprna

Cyclone Nisarg : नुकसान झालेल्यांना योग्य भरपाई देण्यासाठी सरकार सकारात्मक पाऊल उचलेल !

News Desk

‘चोराच्या उलट्या बोंबा’, नाना पटोलेंचा विरोधी पक्षाला टोला

News Desk