मुंबई | नागरिकत्व दुरुस्ती विधेयक काल (९ डिसेंबर) लोकसभेत मंजूर झाले. या विधेयकाला शिवसेनेने लोकसभेत पाठिंबा दिला. मात्र राज्यसभेत शिवसेना या विधेयकाला पाठिंबा देणार नाही, अशी भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (१० डिसेंबर) घेतली. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्ष नेता देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. फडणवीस म्हणाले की, “शिवसेनेने काँग्रेसच्या दबावामुळे आपली भूमिका बदलली का? आणि सरकार वाचविण्यासाठी उद्धव ठाकरेवर दबाव?, असे सवाल त्यांनी शिवसेनेला विचारले आहे.
Maharashtra Former CM Devendra Fadnavis: Winter session of the Assembly has been called for only 6 days. Neither portfolio allocation nor expansion of ministry has taken place since govt formation. It (session) is being held as formality as no body knows who is answerable. pic.twitter.com/1oQIxlEzA7
— ANI (@ANI) December 10, 2019
या विधेयकामधील सत्यता आणि स्पष्टता लोकांसमोर मांडली पाहिजे. या विधेयकात अधिक स्पष्टता येण्याची गरज आहे. तसेच या विधेयकासंदर्भात जोपर्यंत स्पष्टता येत नाही, तोपर्यंत शिवसेना राज्यसभेत विधेयकावर मतदान करणार नाही, अशी भूमिका देखील मुख्यमंत्र्यांनी घेतल्याची माहिती माध्यमांना दिली आहे. या विधेयकाला पाठिंबा देणारे देशभक्त आणि विरोध करणारे देशद्रोही, या भ्रमातून आपण सर्वांनी पहिल्यांदात बाहेर यावे, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपवर टीका केली आहे.
१३ दिवस उटलूनही अद्याप खातेवाटप नाही
फडणवीसांनी पुढे म्हणाले की, राज्यात सरकार स्थापन होऊन १३ दिवस उटलूनही असून देखील अद्याप खातेवाटप झाले नाही. मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. महाविकासआघाडीचे खाते वाटप हिवाळी आधवेशनानंतर होणार असल्याच्या बातम्या माध्यमातून कळत आहे, असे देखील ते म्हणाले. खातेवाटप झाले नसल्याने आम्ही अशा परिस्थितीत उत्तरे कोण देणार, असा सवाल त्यांनी मुख्यमंत्र्यांना विचारला. उद्धव ठाकरेंसह काँग्रेस, राष्ट्रवादीने शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी केली होती. मात्र, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्या मागणीचे पुढे काहीच झालेले नाही, असे फडणवीस म्हणाले.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.