HW News Marathi
महाराष्ट्र

सारंगखेडा चेतक महोत्सव २०१८-१९च्या तिसऱ्या पर्वाचे आयोजन

मुंबई | सलग दोन वर्षांच्या यशस्वी कार्यक्रमांनंतर महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) आणि सारंगखेडा समितीतर्फे सारंगखेडा चेतक महोत्सव २०१८-१९ चे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने पारंपरिक वारसा असलेला हा प्राचीन अश्व महोत्सव साजरा करण्यात येत आहे. या महोत्सवासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पर्यटन मंत्री जयकुमार रावल, केंद्रीय मंत्री गिरीश महाजन आणि खासदार हीना गावित हे मान्यवर उपस्थित होते. या महोत्सवात विविध प्रजातींचे आणि प्रकारचे घोडे पाहायला मिळत आहेत. त्यामुळे अश्वप्रेमींसाठी ही एक पर्वणी आहे. आतापर्यंत या महोत्सवात एकूण ६३७ घोड्यांची विक्री झाली असून त्यांची एकूण मूल्य रु. २,०६,८२,८०० इतके आहे. हा महोत्सव ८ जानेवारी २०१९ पर्यंत सुरु राहणार आहे.

सारंगखेडा चेतक महोत्सव ही देशातील अत्यंत प्राचीन अश्वजत्रा आहे. भारतातील गुजरात, राजस्थान, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेशसारखी राज्ये आणि अफगाणिस्तान, बलुचिस्तान, सौदी अरेबियासारख्या देशांमधून अश्वव्यापारी आणि अश्व खरेदीदार या ठिकाणी आकर्षित होतात. त्याशिवाय पर्यटक या ठिकाणी टेंट सिटीविषयीही जाणून घेऊ शकतात. तसेच या ठिकाणी टेंट पेगिंग, शो जम्पिंग, अश्व नृत्य, अश्व शर्यती, क्वॉड बाइकिंग, पेंट बॉल, तिरंदाजी, अवकाश निरीक्षण, हॉर्स ट्रेल राइड आणि सफारीचा अनुभव घेऊ शकतात.

चेतक महोत्सव ही प्राचीन अश्वजत्रा असून त्याचे आता महिन्याभराच्या सोहळ्यात रूपांतर झाले आहे. उत्तर महाराष्ट्रात तापी नदीच्या किनाऱ्यावरील आकर्षक गावांमध्ये अनेक वर्षांपासून ही जत्रा सुरू आहे. या निमित्ताने या भागातील कला, संस्कृती आणि विविध पैलूंचे दर्शन घडवणे हा या महोत्सवाचा हेतू आहे. या महोत्सवाचा आंतरराष्ट्रीय प्लॅटफॉर्मवर प्रचार करण्यासाठी आणि ‘थिंग्ज टू डू’ अॅक्टिव्हिटीज आणि जगभरातील पर्यटकांना या महोत्सवाविषयी माहिती देण्यासाठी आयोजकांनी ट्रिपएक्सओएक्सओ (TripXOXO) या ऑनलाइन बुकिंग प्लॅटफॉर्मशी सहयोग केला आहे.

या वेळी महाराष्ट्राचे पर्यटन (आणि रोहयो) मंत्री जयकुमार रावल म्हणाले, “जागतिक पर्यटन व्यासपीठावर एक स्थान निर्माण करणे हा या जत्रेचा हेतू आहे. पर्यटन विभाग आणि एमटीडीसी यांच्या एकत्रित प्रयत्नांनी हा महोत्सव नवी उंची गाठेल, याची मला खात्री आहे. स्थानिक आणि परदेशी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी सारंगखेडा महोत्सवा हा एक आदर्श प्लॅटफॉर्म आहे. समृद्ध संस्कृती आणि वारसा साजरा करणाऱ्या या महोत्सवात सहभागी होता आल्याबद्दल मी अत्यंत आनंदी आहे. नंदूरबार जिल्ह्यामध्ये पर्यटनाला चालना देण्याच्या प्रचंड संधी आहेत आणि सारंगखेडा चेतक महोत्सवाच्या निमित्ताने अधिकाधिक पर्यटक या ठिकाणी आकर्षित करण्याचा आमचा प्रयत्न आहे. अश्व कार्यक्रमांपासून ते विविध प्रकारचे खेळ आणि नृत्य सादरीकरणांची रेलचेल असलेला हा महोत्सव भव्य स्वरुपात साजरा होत आहे. पर्यटनामध्ये अधिकाधिक सुधारणा करण्यासाठी सतत नावीन्यपूर्ण प्रयत्न करत असतो आणि नवे मार्ग चोखाळत असतो आणि साहस पर्यटनामध्येही वाढ होत आहे. साहस पर्यटनामध्ये मोठ्या प्रमाणावर पर्यटकांना आकर्षित करण्याची क्षमता आहे. येत्या काळात नंदूरबार जिल्हा आपले वैशिष्ट्यपूर्ण स्थान निर्माण करेल आणि पर्यटन नकाशावर आपली छाप उमटवेल, असा मला विश्वास आहे.”

सारंगखेडा चेतक महोत्सव २०१८ हा सर्वांसाठीच वेग, ऊर्जा आणि ग्लॅमरची अनुभूती देणारा महोत्सव आहे. सर्व वयोगटातील आणि स्थानिक व परदेशातील पर्यटकांचे मनोरंजन करण्यासाठी या वर्षीही अधिक जोशपूर्ण मनोरंजक कार्यक्रमांची रेलचेल या महोत्सवात असणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

औरंगाबाद पदवीधर मतदार संघात राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण दुसऱ्या फेरीत आघाडीवर तर भाजपचे बोराळकर पिछाडीवर

News Desk

‘साकीनाका बलात्कार प्रकरण- फास्ट ट्रॅक कोर्टात चालणार’, मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती

News Desk

एकरकमी FRP द्या, अन्यथा चारचौघात बेइज्जत करू ! राजू शेट्टींचा इशारा

News Desk