HW Marathi
महाराष्ट्र

राज्याच्या मतदार यादीत तब्बल २८ लाखांहून अधिक मतदारांची वाढ

मुंबई | महाराष्ट्राच्या मतदार यादीत तब्बल २८ लाखांहून अधिक मतदारांची वाढ झाली आहे. मतदार यादीच्या अंतिम तपासणीत महाराष्ट्रातील मतदार २८ लाखांहून अधिक मतदार जोडले गेल्याची माहिती मिळत आहे. ३१ जानेवारी रोजी प्रकाशित केलेल्या सुधारित मतदार यादीनुसार तब्बल ३५,६८,३५२ मतदार जोडले गेल्याची माहिती मिळत आहे. तर या मतदार यादीतून तब्बल ७,२९,३३५ नावे हटविण्यात आली आहेत.

महाराष्ट्राच्या मतदार यादीत एकूण २८,३९,०१७ मतदारांची वाढ झाली आहे. राज्य निवडणूक कार्यालयातील अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, राज्यात लोकसभा निवडणुकीसाठी पात्र मतदारांची एकूण संख्या ८,७३,३०,३८४ आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत मतदारांची एकूण संख्या ८.०७ कोटी इतकी होती. एकूण मतदारांपैकी सुमारे ११.९ लाख मतदार १८ ते १९ वयोगटातील आहेत.

Related posts

मी प्रदेशाध्यक्षपदाच्या कार्यकाळात भाजप राज्यात पहिल्या क्रमांकाचा पक्ष झाला

News Desk

विघ्नहर्त्याला ही प्लास्टिक बंदीचे विघ्न

News Desk

जपानचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

Kiran Yadav