HW News Marathi
Covid-19

मुंबईत होणार ऑक्सफर्ड लसीची मानवी चाचणी!

मुंबई | कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. अशा चिंतेच्या वातावरणात एक सुखद बातमी समोर येत आहे.ऑक्सफर्ड लशीच्या चाचण्या करण्यासाठी केईएमच्या एथिक्स समितीने परवानगी दिली असून मुंबईत लवकरच चाचण्यांची प्रक्रिया सुरू होणार आहे.सिरम इन्स्टिट्यूट पुणे आणि मुंबईत ऑक्सफर्डच्या लशीच्या चाचण्या करत आहेत. मुंबईत केईएम आणि नायर रुग्णालयात या चाचण्या होणार आहेत.

मुंबईत प्रत्यक्ष चाचण्या सुरू झाल्या नसल्या तरी पूर्वप्रक्रिया सुरू झाल्या आहेत. केईएमच्या एथिक्स समितीने लशीच्या वैद्यकीय चाचण्यांना काल.(२२ सप्टेंबर) परवानगी दिली आहे. लस टोचून घेण्यासाठी शहरातील जवळपास चारशे स्वयंसेवकांनी नोंदणी केली आहे. लस टोचण्यासाठी निर्देशित केलेल्या अटींची पूर्तता करणाऱ्या स्वयंसेवकांची निवड पहिल्या टप्प्यात केली जाणार आहे. त्यानंतर त्यांना कोरोनाची लागण झाली आहे का नाही? याची पडताळणी करण्यासाठी आरटीपीसीआर, अँटिबॉडी या चाचण्या केल्या जाणार आहेत. आणि त्यानंतर १०० स्वयंसेवकांची निवड केली जाणार आहे. लवकरच या निवड प्रक्रियेला सुरुवात होणार असल्याचे केईएमचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांनी सांगितले.

दरम्यान, मुंबईतील नायर रुग्णालयाने स्वयंसेवकांची निवड प्रक्रिया पूर्ण केली असली तरी सिरम इन्स्टिटय़ूट आणि भारतीय वैद्यक संशोधन परिषदेकडून स्वयंसेवकाचा विमा आणि इतर बाबींबाबत पत्रव्यवहार करण्यात आला आहे. परंतु त्यावर उत्तर न आल्याने प्रक्रिया थांबली असल्याचे नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांनी सांगितले आहे. त्यामुळे लवकरच या चाचण्या सुरू व्हाव्या या प्रतीक्षेत सगळे आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आता तरी जागे व्हा ! फडणवीसांचा आघाडी सरकारला सल्ला 

News Desk

दिलासादायक ! राज्यात आज १२,३२६ रुग्ण कोरोनामुक्त

News Desk

महाराष्ट्रात १ जूनपर्यंत कडक निर्बंध लागू राहणार!

News Desk