HW News Marathi
Covid-19

भारतीयांना कोरोनाची लस मोफत मिळणार ! पण कधी ?

मुंबई | जगभरात कोरोनावरील लस तयार करण्याचे काम सुरू आहे. अ‍ॅस्ट्रॅजेनेका आणि ऑक्सफोर्डने तयार केलेल्या लसीची मानवी चाचणी यशस्वीरित्या पार झाली आहे. या संशोधनात पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचाही मोलाचा वाटा आहे. सध्या या लसीचे काम अंतिम टप्प्यात असून लवकरच ती उपलब्ध होईल अशी माहिती सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने (एसआयआय) कंपनीकडून देण्यात आली आहे.

भारतात कोरोनाच्या लसीची चाचणी यशस्वी झाली तर नोव्हेंबर-डिसेंबरपर्यंत काही लाख आणि मार्च २०२१ पर्यंत जवळपास ३० ते ४० टक्के डोस तयार करण्यात येईल. त्यामुळे मार्च २०२१ पर्यंत ही लस भारतीयांसाठी उपलब्ध होऊ शकेल. भारतात लसीची चाचणी झाल्यानंतर त्याचे परिणाम चांगले आले तर मोठ्या प्रमाणात उत्पादन सुरू करण्यात येईल अशी माहितीही पुनावाला यांना दिली आहे.

डिसेंबर महिन्यात किंवा थोड्या पुढच्या काही दिवसांमध्ये ही लस लोकांना उपलब्ध होऊ शकते. कदाचित ही लस इंग्लंडमध्ये सुरुवातीला थोडीशी आधी उपलब्ध होऊ शकते. पण आपल्याकडे या लसीचे कोट्यावधी डोस आम्ही बनवून तयार ठेवत आहोत. त्यामुळे ती सगळ्यांना लगेच उपलब्ध होईल. आपण कोरोना लसीच्या ९० ते ९५ टक्के जवळ पोहोचलो आहोत, असा दावा सीरम इन्स्टिट्युटचे कार्यकारी संचालक राजीव ढेरे यांनी केला आहे.

लसींच्या एकूण उत्पादनातील 50 टक्के उत्पादन भारतीयांसाठी उपलब्ध करण्यात येणार आहे. अशी माहिती सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ आदर पूनावाला यांनी सांगितली आहे. विशेष म्हणजे, भारतीयांना ही लस खरेदी करता येणार नाही. सरकार या लसीचे पैसे देईल आणि लसीकरण मोहिमेअंतर्गत ती सामान्यांना दिली जाईल, असंही पुनावाला यांनी सांगितलं आहे.त्यामुळे ही लस बाजारात आणल्यानंतर ती भारतीयांना मोफत उपलब्ध होईल हे स्पष्ट झाले आहे.

 

डिसेंबर महिन्यात किंवा थोड्या पुढच्या काही दिवसांमध्ये ही लस लोकांना उपलब्ध होऊ शकते. कदाचित ही लस इंग्लंडमध्ये सुरुवातीला थोडीशी आधी उपलब्ध होऊ शकते. पण आपल्याकडे या लसीचे कोट्यावधी डोस आम्ही बनवून तयार ठेवत आहोत. त्यामुळे ती सगळ्यांना लगेच उपलब्ध होईल. आपण कोरोना लसीच्या ९० ते ९५ टक्के जवळ पोहोचलो आहोत, असा दावा सीरम इन्स्टिट्युटचे कार्यकारी संचालक राजीव ढेरे यांनी केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात आज १५ हजारांहून अधिक नवे कोरोनाबाधित

News Desk

‘धार्मिक आणि राजकीय गर्दीसाठी टाळण्यासाठी एकच धोरण ठेवा’, मुख्यमंत्र्यांची मोदींना विनंती

News Desk

मुख्यमंत्री थोड्याच वेळात संवाद साधणार, MPSC पूर्व परीक्षेसह लॉकडाऊनबाबतही निर्णय जाहीर करणार ?

News Desk