HW News Marathi
Covid-19

महाराष्ट्रातील पहिली ‘ऑक्सिजन एक्सप्रेस’ विशाखापट्टणमला पोहोचली!

मुंबई | राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव चिंतेचा विषय ठरला आहे. यामुळे अनेक रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा भासत आहे. ऑक्सिजन अभावी अनेक रुग्णांना आपला जीव गमवावा लागतो आहे. अशावेळी रेल्वे मंत्रालयाने एक मोठा निर्णय घेतला आहे. रेल्वेद्वारे अन्य राज्यांमध्ये महाराष्ट्राला ऑक्सिजन पुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्याला ऑक्सिजन वाहून आणण्यासाठी ७ मोठे टँकर घेऊन जाणारी ‘ऑक्सिजन एक्स्प्रेस’ आज (२२ एप्रिल) पहाटे विशाखापट्टणम येथे दाखल झाली आहे. यातील टँकरमध्ये ऑक्सिजन भरण्यासाठी २० तासांचा वेळ लागणार आहे.

राज्यातील पहिली ऑक्सिजन एक्सप्रेस ७ रिकामे टँकर घेऊन १९ एप्रिलला रवाना झाली होती ती आज पहाटे ४ वाजता विशाखापट्टणम येथे पोचली आहे. यात ऑक्सिजन भरण्यासाठी तब्बल २० तासांचा कालावधी लागणार आहे. आंध्रप्रदेशातील विशाखा स्टील प्लांटमधून महाराष्ट्राला ऑक्सिजनचा पुरवठा केला जात आहे. या प्लांटमधील अधिकाऱ्यांनी या टँकरमध्ये ऑक्सिजन भरण्यासाठी पूर्ण तयारी केली आहे.

ऑक्सिजन भरल्यानंतर रेल्वेतील इंजिनिअरच्या मदतीने हे टँकर रेल्वेवर चढवले जातील. त्यानंतर रात्रीपर्यंत ती एक्सप्रेस पुन्हा परत महाराष्ट्रात येण्यासाठी रवाना होईल, अशी माहिती समोर आहे. या एक्स्प्रेसच्या माध्यमातून येत्या ५ दिवसांत ११० मेट्रिक टन द्रवरुप ऑक्सिजनचा पुरवठा रेल्वेवाहतुकीच्या माध्यमातून राज्याला होणार आहे. ऑक्सिजन तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी सुचवल्याप्रमाणे राज्याच्या प्रशासनाने वेगवेगळ्या पर्यायांची चाचपणी करत रेल्वे मार्गे ऑक्सिजन वाहतूक करता येईल असं केंद्र शासनाला सुचवलं होतं. त्यानुसार ही एक्स्प्रेस चालवण्यास रेल्वेने मंजुरी देण्यात आली आहे.

कसा असणार ‘ऑक्सिजन एक्सप्रेस’चा मार्ग ?

कळंबोली येथून विशाखापट्टणमकडे ऑक्सिजन एक्स्प्रेस चालविणे अधिक व्यवहार्य असल्याने 2 दिवसात येथिल प्लॅटफॉर्मचे काम पूर्ण करण्यात आले. त्यानंतर आज प्रत्यक्ष रिकामे टँकर सपाट वॅगनवर ‘रोल ऑन-रोल ऑफ’ पद्धतीने चढवून सायंकाळी ७ वाजता ऑक्सिजन एक्स्प्रेस रवानाही करण्यात आली. हे प्रत्येकी १६ मेट्रिक टन द्रवरुप ऑक्सिजन वाहतुकीची क्षमता असलेले विशेष टँकर आहेत.

 

आयनॉक्स एअर प्रॉडक्ट्स, ताईयो निप्पॉन सॅन्सो इं., एअर लिक्विड, लिंडे आदी कंपन्यांचे हे टँकर आहेत. नेहमीच्या पुणे-सिकंदराबाद- विजयवाडा रेल्वेमार्गा वर पुणे दरम्यान बोगदे असल्यामुळे ओव्हरहेड वायरची उंची तुलनेत कमी होत असल्याने या मार्गावरुन ऑक्सिजनचे टँकर वाहून नेणे शक्य नव्हते. सूरत- नंदूरबार- जळगाव- नागपूर असा हा निवडण्यात आला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात आज २७३९ नवे कोरोना रुग्ण, तर २२३४ कोरोनामुक्त

News Desk

राज्यातील वैधानिक विकास मंडळांना तत्काळ मुदतवाढ द्यावी, फडणवीसांची मुख्यमंत्र्यांना विनंती

News Desk

राष्ट्रवादीचे माजी विरोधी पक्षनेते आणि विद्यमान नगरसेवक दत्ता साने यांचे कोरोनामुळे निधन

News Desk