HW News Marathi
देश / विदेश

पी. व्ही. सिंधू उपांत्यपूर्व फेरीत दाखल!

टोक्य। भारताची सर्वतोकृष्ट बॅडमिंटनपट्टू पी. व्ही. सिंधू आता टोक्यो ऑलिम्पिक्समध्ये रौप्यपदक जिंकणाऱ्या सिंधूने डेनमार्कच्या मिया ब्लिचफेल्डचा दोन सरळ सेटमध्ये पराभव करत उपांत्यपूर्वी फेरीत आपला प्रवेश निश्चित केला. जागतिक क्रमवारीत सातव्या क्रमांकावरील सिंधूने उपउपांत्यपूर्व फेरीत डेन्मार्कच्या क्रमवारीत १२ व्या स्थानावरील मिया ब्लिकफेल्डचा ४० मिनिटांमध्ये २१-१५, २१-१३ अशा फरकाने पराभव केला. त्यामुळे आता सिंधू पदकापासून केवळ दोन विजय दूर आहे. या विजयामुळे सिंधूची मियाविरुद्धची आतापर्यंतच्या सामन्यांमधील सिंधूची कामगिरी ५-१ अशी झालीय. म्हणजेच या दोघींमध्ये झालेल्या सहा सामन्यांपैकी पाच सामने सिंधूने जिंकलेत. उपांत्यपूर्व फेरीत दाखल झाली आहे.

पुरुष हॉकी संघाचा विजय

भारत टोक्यो ऑलिम्पिक्समध्ये मध्ये कमालीची कामगिरी बजावत आहे. 42 व्या मिनिटाला भारताने पेनल्टी कॉर्नरसाठी अपील केलं आणि ते मिळालं. यावेळी वरुणने कॉर्नरचा फायदा घेत सामन्यातील पहिला गोल केला. त्याच वेळी, 45 व्या मिनिटाला संघाला पुन्हा दुसरा पेनल्टी कॉर्नर मिळाला परंतु यावेळी ते गोलमध्ये रूपांतरित करू शकले नाहीत. भारताला आतापर्यंत रीबाऊंडवर पाच कॉर्नर मिळाले आहेत. चौथ्या उपांत्यपूर्व सामन्यात अर्जेटिनाने बरोबरी साधून सामन्याची उत्कंठा वाढवली आहे. 48 व्या मिनिटाला अर्जेटिनाच्या केसेलाने पेनल्टी कॉर्नरमध्ये रुपांतर करून 1-1 अशी बरोबरी साधली. हा सामना जिंकणे भारताला गरजेचं आहे.

साताऱ्याच्या प्रविण जाधवची टोक्यो ऑलिम्पिकमध्ये कमाल

टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारत कमालीची कामगिरी करताना दिसत आहे. भारतीय तिरंदाज प्रविण जाधव याने रशियाच्या गलसान बझारझापोव्हला अनपेक्षित धक्का दिलाय. प्रविणने तिरंदाजीमध्ये जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या गलसान बझारझापोव्हला हरवलं आहे. एलिमेनशन राऊण्डमध्ये प्रविणने ही भन्नाट कामगिरी केलीय. प्रविणने ही कामगिरी ३२ जणांच्या पहिल्या फेरीत केली असून पदकापर्यंत पोहचण्यासाठी त्या अजून किमान दोन विजय आवश्यक आहेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

हिंदुरुदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिस्थळाची माती घेऊन नगरसेवक अयोध्येत दाखल

News Desk

गुजरातपासून होणार सवर्ण आरक्षणाची अंमलबजावणी

News Desk

सुनील अरोरा मुख्य निवडणूक आयुक्तपदी विराजमान 

News Desk