HW News Marathi
देश / विदेश

ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर

मुंबई | ज्येष्ठ पार्श्वगायक सुरेश वाडकर यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाली आहे. वाडकर यांनी मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीमध्ये अनेक बाहारदार गाणी घायली आहेत. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारकडून पद्म पुरस्कारांची घोषणा केली जाते.सुरेश वाडकरांनी हिंदी आणि मराठीसह भोजपुरी आणि कोकणी भाषेतही हजारो गाणी गायली आहेत.

वाडकरांनी ओंकार स्वरुपा सदगुरु समर्था, तू सप्तसूर माझे, सुरमयी अखियों मे, ऐ जिंदगी गले लगा ले, सपने में मिलती है, चप्पा चप्पा चरखा चले यासारखी अनेक गाजलेली गाणी वाडकरांच्या आवाजात स्वरबद्ध झाली आहेत. ‘पद्मश्री’च्या रुपाने सुरेश वाडकरांच्या स्वरमयी कारकीर्दीला कोंदण लाभले आहे.

सुरेश वाडेकर यांचा जन्म ७ ऑगस्ट १९५५ रोजी कोल्हापुरात झाला. लहानपणापासूनच त्यांना गाण्याची आवड होती. वयाच्या दहाव्या वर्षापासूनच त्यांनी गुरु पंडित जियालाल वसंत यांच्याकडून संगीताचे शिक्षण सुरु केले. २००७ मध्ये महाराष्ट्र सरकारने सुरेश वाडकर यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने गौरव केला होता. २०११ मध्ये सुरेश वाडकरांना ‘मी सिंधुताई सपकाळ’ या मराठी चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

2007 Hyderabad Twin Blasts Case | एनआयए स्पेशल कोर्टाने आरोपींना ठरवले दोषी

News Desk

चीनचा संताप अनाठायी

News Desk

“सरकारनं भींती उभारायचं काम करु नये”, राहूल गांधींचा केंद्राला खोचक सल्ला

News Desk