HW News Marathi
महाराष्ट्र

पालघर, भंडारा-गोंदियाचे आज मतदान

पालघर | पालघर आणि भंडारा-गोंदिया या दोन मतदारसंघात लोकसभा पोटनिवडणुकांसाठी आज 28 मे रोजी मतदान होत आहे. सकाळी 7 वाजल्यापासून या ठिकाणी मतदानाला सुरुवात झाली आहे.

पालघरच्या पोटनिवडणुकांकडे फक्त राज्याचेच नव्हे तर संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. कारण भाजप आणि शिवसेनेने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली असून या निवडणुकीच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडताना महाराष्ट्राच्या जनतेला पहायला मिळाल्या. पालघरचा गड काबीज करण्यासाठी दोन्ही पक्षांनी आपली शक्ती पणाला लावलेली पहायला मिळाली. उद्धव ठाकरेंनी स्वतःप्रचारसभा घेतल्यामुळे या प्रचाराला एक वेगळीच रंगत आली होती.

भाजपच्या वतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, स्मृती इराणी हे देखील प्रचाराच्या रिंगणात उतरले. एवढेच नाहीतर अखेरच्या दिवशी सेनेने मुख्यमंत्र्यांची ऑडिओ क्लिप बाहेर काढून एकच खळबळ उडवून दिली. मुख्यमंत्र्यांनीही संपूर्ण क्लिप प्रसिद्ध करून सेनेवर पलटवार केला. एकत्र सत्तेत राहणारे दोन्ही पक्ष पालघर मध्ये जिंकणार का ? याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

भंडारा आणि गोंदिया पोटनिवडणुकीकडे देखील विदर्भाचे लक्ष आहे. कारण भाजपमधून काँग्रेसमध्ये प्रवेश करणाऱ्या नाना पटोले यांना ऐनवेळी उमेदवारी मिळाली नाही. त्यामुळे राष्ट्रवादी आणि भाजप अशी लढत गोंदिया-भंडारामध्ये होणार आहे. या निवडणुकीत एकूण 18उमेदवार असून खरी लढत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे मधुकर कुकडे आणि आणि भाजपचे हेमंत पटले यांच्यात आहे. आज सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान सुरू राहणार आहे.

या निवडणुकीत पहिल्यांदाच व्हीव्हीपीटीचा वापर होणार आहे. गोंदिया जिल्ह्यात अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नक्षलग्रस्त भागात फक्त 3 वाजेपर्यंतच मतदान होणार आहे. या निवडणुकीत भंडारा गोंदिया मिळून 17 लाख 59 हजार 977 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील,या मध्ये 8,82,175 हे पुरुष मतदार आहेत तर 8,75,679 महिला मतदार आहेत. मतदानासाठी 2149 मतदान केंद्रे स्थापन केले आहेत. यावर 11 हजार 700 कर्मचा-यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतदान सुरळीत चालावे म्हणून 1909 पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. त्याचबरोबर अतिरिक्त पोलीस बलाच्या ५ तुकड्या नेमण्यात आल्या आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बिहारची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर लढवणार – खासदार प्रफुल पटेल

News Desk

काही तास बाकी वादळापूर्वीची शांतता !

News Desk

निकालानंतर माझा बाप आठवल्याशिवाय राहणार नाही! – रोहित आर आर पाटील

Aprna