मुंबई | पालघर मॉबलिंचिंक घटेत तीन सांधूची हत्या करण्यात आली. पालघरमधील हा अतिशय दुर्गम भाग असून याठिकाणी रात्रीच्या वेळी काही लोक येतात आणि मुलांना पळवतात. यातूनही संपूर्ण घटना घडली आहे. या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपविण्यात आल्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हद्वारे राज्यातील जनतेशी संवाद साधताना सांगितले. या घटनेच्या वेळी हे लोक ओय बस, ओय बस असा आवाज दिला जात होता. ओय बस या शब्दाचा अर्थ बस थांबवा असा होता, मात्र, या शब्दाचा विपर्यास करत शोएब बस असा करण्यात आला, अशी माहिती राज्याचे अनिल देशमुख यांनी दिली आहे.
There was a sound heard in the video 'Oye Bas', people circulated it online and some called it 'Shoeb Bas'. All state mechanism is fighting the pandemic & some people tried to bring communal angle in this matter: Maharashtra Home Minister Anil Deshmukh on Palghar incident https://t.co/0S1RTsByMJ
— ANI (@ANI) April 22, 2020
पालघरमधील ज्या भागात हा संपूर्ण प्रकार घडला. तो संपूर्ण परिसर आदिवासी भागामध्ये मोडत असून येथली लोकांना आदिवासी भाषेत हे लोक बोलत होते. त्यामुळे शब्दाचा विपर्यास करून या प्रकरणाला धार्मिक वळ देण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप अनिल देशमुखांनी विरोधाकांवर केला आहे. ही घटना घडल्यानंतर अवघ्या ८ तासांत पोलिसांनी १०१ जणांना ताब्यात घेतले आहे. या १०१ आरोपींमध्ये एकाही मुस्लिम व्यक्तीचे नाव नाही, असेही देशमुखांनी सांगितले. कोणत्याही मुस्लिम व्यक्तीचा या घटनेशी काही संबंध नाही. सध्या महाराष्ट्रातील पोलीस, आरोग्य कर्मचारी सर्व यंत्रणा कोरोनाविरूद्ध लढाई लढत आहे. काही लोक जातीचे राजकारण करत आहेत, ही दुर्देवी घटना आहे. आज राजकारण करण्याची वेळ नाही. करोनाच्या संकटात एकत्र येऊन लढण्याची ही वेळ आहे. करोनाविरुद्धची लढाई आपल्याला जिंकायची आहे, असेही देशमुख म्हणाले.
पालघर येथील घटनेत अटक झालेल्या १०१ जणांची यादी इथे सार्वजनिक करण्यात येत आहे. जी विघ्नसंतोषी मंडळी या घटनेला धार्मिक रंग देण्याचा सातत्याने प्रयत्न करत होती, त्यांनी नक्की पहावी…#ZeroToleranceForCommunalism#LawAndOrderAboveAll pic.twitter.com/pjouXo9NhQ
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) April 22, 2020
देशमुख यांनी वाधवान प्रकरणावरही भाष्य
वाधवान कुटुंबीयाचा क्वॉरंटाइन पिरियड आज दुपारी २ वाजता संपणार आहे. ईडी आणि सीबीआयला आम्ही कालच (२१ एप्रिल) पत्र लिहून त्याबाबतची कल्पना दिली आहे. सीबीआयचे अधिकारी जो पर्यंत वाधवान कुटुंबाला ताब्यात घेत नाही तोपर्यंत ते आमच्या ताब्यात असतील. गेल्या १५ दिवसांपासून त्यांना एका हायस्कूलमध्ये क्वारंटाईन करण्यात आले आहे. राज्य शासन कोणत्याही परिस्थितीत वाधवान कुटुंबाला पाठीशी घालत नाही, असे स्पष्टीकरण अनिल देशमुख यांनी दिले आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.