HW News Marathi
महाराष्ट्र

पंकजा मुंडेंनी विकास करण्याची जबाबदारी देत धनंजय मुंडेंना दिल्या शुभेच्छा…  

बीड | राज्याच्या राजकारणातील दोन बडे चेहरे आणि वैयक्तिक आयुष्यातील बहीण भाऊ म्हणजेच सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे आणि माजी मंत्री पंकजा मुंडे हे आज एकाच व्यासपीठावर पाहायला मिळाले. एकमेकांचे कट्टर राजकीय शत्रू असलेले दोन्ही नेत्यांना गहिनीनाथ गडाने एकाच मंचावर आणलं. हे चित्र पाहण्यासाठी बीडकरांची गर्दी लोटली होती. यावेळी धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे या दोघांनीही उपस्थितांना संबोधित केलं.

पंकजा मुंडे म्हणाल्या, “गहिनीनाथ गड तमाम भाविकांचे श्रद्धास्थान आहे, कुठेही असो हा क्षण कधी चुकवू दिला नाही. तुमच्या सर्वांमध्ये मला वामनभाऊंचे दर्शन घडते म्हणून तुमच्या दर्शनासाठी मी इथं येते. पालकमंत्री असताना गडाच्या विकासाकरिता योगदान दिले, पुढेही देत राहू. आज देण्यासारखं काही नसलं तरी प्रेमाची देवाणघेवाण मात्र होत राहील असं पंकजा मुंडे म्हणाल्या. संयम, क्षमाभाव आणि परोपकार ही संतांची शिकवण आत्मसात करण्याची खरी गरज आहे, त्यांच्या संघर्षाची ज्योत घेऊन पुढे चालायचे आहे. संत वामनभाऊंचे विचार दैनंदिन जीवनात प्रत्यक्ष आचरणात आणून कर्म केले तरच पुण्य लाभेल असे सांगून आपण मिळालेल्या संधीचं सोनं केल भविष्यातही करेल,” असे सांगत जिल्हयाच्या विकासासाठी सत्ताधाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.

एकाच व्यासपीठावर धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे असताना टोलेबाजी होणार नाही असं होऊच शकणार नाही. “आता ज्यांच्या हातात सत्ता मिळालीय ते नक्कीच चांगला विकास करतील यासाठी त्यांना शुभेच्छा.असं म्हणून पंकजा मुंडेंनी नाव न घेता धनंजय मुंडेंना पुढील काळासाठी शुभेच्छा दिल्या. तर पंकजा मुंडेंच्या शुभेच्छांना उत्तर देत धनंजय मुंडे म्हणाले, की त्यांनी विकासाची जबाबदारी दिली तर पुढे त्यांना शुभेच्छा अनेक वर्षे द्याव्या लागतील”, असं म्हणत धनंजय मुंडेंनी पंकजा मुंडेंवर साधला निशाणा होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ST कर्मचारी सोमवारीपासून कामावर आले नाही, तर…! – परब

News Desk

हेगडेंनी केलेल्या या आरोपाचे फडणवीसांनी केले खंडण

News Desk

क्रिकेट सोबतच सर्व खेळामध्ये दलित खेळाडूंना आरक्षण द्या – रामदास आठवले यांची मागणी

News Desk