HW News Marathi
महाराष्ट्र

पंढरपूरचा पांडूरंग भाजपला पावला ! भगिरथ भालकेंचा धुव्वा उडवत समाधान अवताडे विजयी

सोलापूर | पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा निकाल आज (२ मे) ा झाला आहे. देशातील पाच राज्यांच्या निवडणुकीसह पंढरपूरच्या पोटनिवडणुकीची मतमोजनी सुरु होती. या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके आणि भाजपचे उमेदवार समाधान आवताडे यांच्यात काँटे की टक्कर बघायला मिळाली. या राष्ट्रवादी आणि भाजपच्या चुरशीच्या लढतीत भाजप उमेदवार समाधान आवताडे यांचा ३ हजार पेक्षा जास्त मत मिळवत दणदणीत विजय झाला आहे.

पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपने महाविकास आघाडीला दणका दिला. भाजपचे समाधान आवताडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे भगीरथ भालके यांचा पराभव केला. राष्ट्रवादीचे दिवंगत आमदार भारत भालके यांच्या निधनाने रिक्त झालेल्या आणि राष्ट्रवादीसह भाजपनेही प्रतिष्ठेच्या केलेल्या पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी आज पार पडली.

या निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके विजयी होणार की भाजपचे उमेदवार समाधान आवताडे बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. अखेर अटीतटीच्या या लढतीत समाधान आवताडे यांनी बाजी मारली.

समाधान आवताडे यांची पहिली प्रतिक्रिया काय दिली होती?

“विजय आमचा निश्चित आहे. फक्त औपचारिकता राहिली आहे. त्याची वाट बघतोय. त्यानंतर सविस्तर भूमिका मांडेल. प्रशांत पारिचारिक आणि सर्व पंढरपुराने ताकद दिली होती. विजय हा जनतेचाच आहे. या सरकार विरोधात जनतेने दिलेला कौल आहे. गुलाल कार्यकर्त्यांनी उधळलेला आहे. विजय आमचाच होणार आहे. फक्त उतावीळपणा नको”, अशी प्रतिक्रिया समाधान आवताडे यांनी दिली होती.

प्रशांत पारिचारक यांची प्रतिक्रिया काय दिली होती?

यावेळी प्रशांत पारिचारक यांनीदेखील प्रतिक्रिया दिली. “आमचा विजय निश्चित आहे, फक्त अधिकृत घोषणा बाकी आहे. त्यामुळे उतावीळ न होता थोडं संयमाने घेणं आवश्यक आहे. ही निवडणूक जनतेने हातात घेतली होती. त्याचाच यामध्ये विजय बघायला मिळतोय. राज्य सरकारची सगळी यंत्रणा या ठिकाणी होती. तरीसुद्धा लोकांपुढे आम्ही एकत्र गेलो. लोकांना विश्वास दिला. या तालुक्यात आम्ही गेले 30 ते 40 वर्षे काम केलं. मतदारांनी विश्वास दाखवला त्यामुळे हा विजय शक्य झाला आहे”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उद्धव ठाकरे म्हणतात, गडकरीजी महाराष्ट्राला आपल्या मदतीची गरज!

News Desk

महाराष्ट्र बोलघेवड्यांचे राज्य नाही, जे बोलतो ते करुन दाखवतो, गुन्हेगारीवर मुख्यमंत्र्याचे वक्तव्य!

News Desk

मी राजीनामा देतो, साताऱ्यात पुन्हा निवडणूक घ्या !

News Desk