HW News Marathi
महाराष्ट्र

गोपीनाथ गडावर पंकजांचा पराभव

बीडः गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने गोपीनाथ गड असलेल्या पांगरी गावातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत मंत्री पंकजा मुंडे यांचा धनंजय मुंडे गटाने पराभव केला आहे. ओबीसी समाजाच्या नेत्या म्हणून पंकजा मुंडे गोपीनाथ मुंडेंची जागा घेऊ शकतात, या शक्यतेला या निकालाने तडा गेला आहे.

अकरा सदस्य असणाऱ्या या ग्रामपंचायतीमध्ये धनंजय मुंडे गटाचे दहा सदस्य निवडून आले आहेत. तसेच सरपंचपदीही राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून आला आहे. यापूर्वी पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांचे जन्मगाव असलेल्या नाथरा ग्रामपंचायत बिनविरोध झाली होती. या ठिकाणी नऊपैकी पाच सदस्य राष्ट्रवादी पुरस्कृत तर चार भाजप पुरस्कृत होते. सरपंचपदही राष्ट्रवादीच्या वाटयाला आले. त्यानंतर आता पंकजा मुंडे यांनी ज्या गावात गोपीनाथ गड उभारला त्या पांगरी गावच्या ग्रामपंचायतीवरही राष्ट्रवादीची सत्ता आली आहे. या निकालाने पंकजा यांची मतदारसंघातील पकड कमकुवत होत असल्याचे दिसून येत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“फडणवीसांनी केलेल्या सूचनांचा विचार करू!”, चर्चेनंतर परबांचे सूचक वक्तव्य

News Desk

मुंबईत पाणी कपातीचा प्रश्न सोडवण्यासाठी खारे पाणी गोडे करणार

News Desk

भाजपमध्ये दोन लाखांत तिकीट ?

News Desk