HW News Marathi
महाराष्ट्र

धनंजय मुंडेंसमोर पंकजांनी हत्यार टाकले? जिल्हा बँकेच्या निवडणुकीवर पंकजा मुंडेंचा बहिष्कार!

बीड | बीड येथील डीसीसी बॅंकेची निवडणुक उद्या (२० मार्च) होत आहे.थेट पंकजा मुंडे विरूद्ध धनंजय मुंडे हा सामना रंगणार हे चित्र दिसत असतानाचं पंकजांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. डीसीसी बँक निवडणूक रिंगणातून मतदानाच्या काही तासांपूर्वीच भाजपच्या माजी मंत्री पंकजा मुंडेंनी माघार घेतली आहे. भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषदेत मुंडेंनी ही घोषणा केली आहे.

यावेळी पंकजा मुंडे म्हणाल्या की , डीसीसी बँक निवडणुकीत पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी सत्तेचा वापर केला. त्यामुळे ८ जागांसाठी होऊ घातलेल्या निवडणुकीवर भाजप बहिष्कार घालत आहे. आम्ही लोकशाही प्रक्रिया म्हणून या निवडणूकीकडे पाहत होतो. पण निवडणुकीत सत्तेचा गैरवापर होतोय.त्यामुळे निवडणुक प्रक्रियेवर पंकजा मुंडेंनी बहिष्कार टाकला आहे.

मतदानावर बहिष्कार टाकण्याची भूमिका घेत पंकजांनी धनंजय मुंडेंच्या प्रभावामुळे माघार घेतली असल्याची चर्चा सध्या जिल्ह्यात जोर धरत आहे. तर, बहिष्कार टाकायचा होता तर उमेदवारी अर्ज का भरले ? असा सवालही उपस्थित होतो आहे. यामुळे धनंजय मुंडे गटाचा प्रभाव वाढला आहे.पंकजा मुंडेंच्या या माघारीमुळे धनंजय मुंडे यांचे वर्चस्व मात्र दिसून येत असल्याच्या चर्चा जोर धरत आहेत

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

खासदार मोहन डेलकर यांचा मुंबईतील हॉटेलमध्ये आढळला मृतदेह

News Desk

“अजित पवार भेसळ करायला लागले असं व्हायचं…” उपमुख्यमंत्र्यांनी सांगितला त्या बंद केलेल्या पेट्रोल पंपचा किस्सा

News Desk

होर्डिंग प्रकरणी कॅप्शन अॅडव्हर्टाझिंग कंपनीच्या मालकाला अटक

swarit