HW News Marathi
देश / विदेश

पंकजा म्हणतात, मी महाराष्ट्रापासून दूर कशी जाईन ? 

मुंबई | “मी महाराष्ट्रापासून दूर कशी जाईन.आपल्या मुळापासून आपण कधीही दूर जात नाही. मी महाराष्ट्र भाजपच्या टीममध्ये आहेच”, अशी प्रतिक्रिया भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी आज (२७ जुलै) दिली आहे. पंकजा या ‘टीव्ही ९ मराठी’ या वृत्तवाहिनीशी बोलत होत्या. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र भाजपच्या नव्या कार्यकारिणीची पहिलीच बैठक आज पार पडली. या बैठकीत नव्या कार्यकारिणीच्या बैठकीतही पंकजा मुंडेंना पाचारण करण्यात आले होते. यानंतर पंकजा मुंडेंनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

“मी महाराष्ट्रापासून दूर जाणार नाही. आपल्याला नव्या संधी मिळत असतील, आपली व्याप्ती वाढत असेल, आपल्याला वेगवेगळे अनुभव मिळत असतील तर त्यात काहीही हरकत नाही. पक्षश्रेष्ठी योग्य तोच निर्णय घेतील. मी आता महाराष्ट्रभर काम करत आहे. मला आतापर्यंत जी जबाबदारी दिली ती पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचप्रमाणे, पक्षश्रेष्ठींकडून जी जबाबदारी दिली जाईल तिथेही मी योग्य तेच काम करेन. मी सदैव आनंदी आहे”, अशीही प्रतिक्रिया यावेळी पंकजा मुंडेंनी दिली आहे.

पंकजांवर राष्ट्रीय पातळीवर मोठी जबाबदारी सोपवली जाणार !

महाराष्ट्र भाजपच्या नव्या कार्यकारिणीतील नावे जेव्हा जाहीर झाली तेव्हा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पंकजा मुंडेंबद्दल एक मोठी घोषणा केली होती. पंकजा जरी राज्य कार्यकारिणीत नसल्या तरीही त्यांना पक्षश्रेष्ठींकडून राष्ट्रीय पातळीवर मोठी जबाबदारी सोपवली जाणार असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केले होते. याच पार्श्वभूमीवर बोलताना, राष्ट्रीय पातळीवरची जबाबदारी सोपविली तरी आपण महाराष्ट्रापासून दूर जाणार नाही. ते मूळ आहे, अशी प्रतिक्रिया पंकजा मुंडेंनी दिली आहे.

मी कोणापासूनही अलिप्त नाही !

“मी कोणापासूनही अलिप्त नाही. मात्र, सध्या मी प्रशासनाला सहकार्य करत आहे. कोरोनाच्या या काळात शिस्त पाळत आहे. गर्दी आणि संसर्ग टाळण्यासाठी मी खूप काळजी घेत आहे. कोणत्याही थेट कार्यक्रमाला न जाता मी व्हर्च्युअल कार्यक्रम करत आहे. मला सतत काम करण्याची इच्छा आहे. सध्या मी महाराष्ट्रात काम करत आहे. ”, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. मला आतापर्यंत जी जबाबदारी दिली ती पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे. आताही पक्षश्रेष्ठींकडून जी जबाबदारी दिली जाईल ती देखील मी पार पडेन”, असेही पंकजा यावेळी म्हणाल्या

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बाबरी मशीद प्रकरणी लालकृष्ण आडवाणींसह सर्व आरोपींना ३० सप्टेंबरला कोर्टात हजर राहण्याचे निर्देश

News Desk

ज्येष्ठ नागरिकाच्या हत्येप्रकरणी वाहन चालकाला जन्मठेप

News Desk

चीननं खुपसला त्यांच्या नोबेल विजेत्याच्या पाठीत खंजीर

News Desk