HW News Marathi
देश / विदेश

बीड जिल्ह्यातील लोक प्रतिनिधींसह पंकजा मुंडे, प्रीतम मुंडे थेट दिल्लीत!

दिल्ली | केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची आज भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे व बीड जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, पदाधिकाऱ्यांसोबत दिल्लीत भेट घेतली.बीड शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गासाठी दिलेल्या निधीबद्दल व पंकजा मुंडे यांनी रस्त्याच्या कामासंदर्भात केलेल्या ट्विटची तात्काळ दखल घेऊन कार्यवाही केल्याबद्दल त्यांचे आभार मानले. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याचे वाहतूक प्रश्न आणि रस्ते-महामार्गांविषयी संबंधित लोकप्रतिनिधीनी त्यांना निवेदन सादर केले,यापैकी काही विषयांवर तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना नितीन गडकरी यांनी दिल्या.मात्र, कोणतीही राजकीय चर्चा झाली नाहीया भेटीत मंत्री महोदयांनी जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्न आणि विकास कामांसंदर्भात चर्चा करण्यासाठी मुबलक वेळ दिल्याबद्दल पंकजा मुंडे यांनी नितीन गडकरी यांचे मानले आभार.

पंकजा मुंडे, प्रीतम मुंडे नितीन गडकरींना भेटल्या, राजकीय चर्चा झाली का?

असा देखील एक प्रश्न उपस्थित होतो. भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि खासदार प्रीतम मुंडे यांनी आज केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांची आज भेट घेतली. या भेटीत बीड जिल्ह्यातील विकास कामांवर चर्चा झाली. मात्र, कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही, असं पंकजा मुंडे यांनी सांगितलं.भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि खासदार प्रीतम मुंडे यांनी आज अचानक परिवहन मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या. तब्बल तासभर ही भेट चालली. त्यानंतर पंकजा यांनी मीडियाशी संवाद साधला. या भेटीत राजकीय चर्चा झाली का? असा सवाल पंकजा यांना करण्यात आला. त्यावर या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचं त्यांनी सांगितलं.

ती गडकरींची स्टाईल आहे

माझ्या जिल्ह्यातील विकास कामे मार्गी लावण्यासाठी एक शिष्टमंडळ घेऊन गडकरींना भेटले. प्रीतम मुंडे, आमदार माधुरी मिसाळही सोबत होत्या..विकास कामांचा विषय होता. त्यांनी आमच्या भागातील विकास कामे केली आहेत. गडकरींनी परळीला भरभरून दिलं आहे. त्यामुळे त्याबद्दल त्यांचे आभारही मानले. तसेच काही छोटीमोठी कामे प्रलंबित होती. ती त्यांनी लगेच मार्गी लावली. जागच्या जागीच त्यांनी कामाचा निपटारा केला. ती गडकरींची स्टाईल आहे, असं त्यांनी सांगितलं.

तर अमित शहांची भेट घेईन

दरम्यान, काल केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा आणि महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची काल भेट झाली. त्यावर बोलण्यास पंकजा यांनी नकार दिला,. मी त्या शिष्टमंडळात नव्हते. त्यामुळे त्यावर बोलता येणार नाही. माझ्या कारखान्याच्या समस्या मांडायच्या असेल तर मी नक्कीच शहांची भेट घेईल, असं त्यांनी स्पष्ट केलं.

माझाही कारखाना अडचणीत

दरम्यान, पंकजा मुंडे यांनी काल मीडियाशी संवाद साधताना सहकार क्षेत्र आणि कारखानदारीबाबत भाष्य केलं होतं. ज्यात सहकार अडचणीत आहे. अनेक कारखान्यांना दुष्काळाचा फटका बसला आहे. मीही त्याचा भाग आहे. माझाही कारखाना प्रचंड आर्थिक नुकसानीत आहे. शेतकऱ्यांसाठी उस गाळप करताना शेतीवर आधारीत उद्योगांना वेगळी वागणूक न देता ऊसाचे भाव वाढवतो तसेच साखरेच्या आणि इथेनॉलच्या भावाबाबत निर्णय घेतला पाहिजे. जेव्हा अॅग्रोबेस्ड उद्योग चालवताना शेतकऱ्यांना समोर ठेवून निर्णय घेतो. पण त्याचं जे प्रोडक्ट आहे त्या प्रोडक्ट मध्ये नफा नाही मिळाला तर तो उद्योग तोट्यात जातो. पर्यायाने शेतकरीही अडचणीत येतो. साखर कारखानदारीची परिस्थिती आज तशीच आहे. नितीन गडकरींनी आम्हाला त्यावेळी मदत केली. त्यांनी साखरेचे भाव स्थिर केले. इथेनॉलसह इतर टॅक्सबाबत चांगले निर्णय घेतले. त्यांचाही सहकारात मोठा अभ्यास आहे, असं त्या म्हणाल्या होत्या.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘भीतीपोटीच आरबीआयच्या नियंत्रणाला पवारांचा विरोध’, भाजपचा पलटवार

News Desk

रमजानच्या काळात अतिरेक्यांच्या विरोधात कारवाई होणार नाही  

News Desk

आयएनएस विक्रांतचे जलावतरण छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन! – मुख्यमंत्री

Aprna