HW News Marathi
महाराष्ट्र

पंकजा मुंडेंनी घेतली संभाजीराजेंची सदिच्छा भेट

बीड।खासदार छत्रपती संभाजीराजे यांचं आज बीडमध्ये जंगी स्वागत करण्यात आलं. मराठा आरक्षण जनसंवाद दौऱ्यासाठी छत्रपती संभाजीराजे दोन दिवसांसाठी बीड जिल्हा दौऱ्यावर आहेत.बीड शहरात दाखल झाल्या नंतर यावेळी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी त्यांची सदिच्छ भेट घेत सत्कार केला. यावेळी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडेची देखील यावेळी उपस्थिती होती.

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरुन संभाजी राजे राज्यभरात दौरे काढून मराठा समाज बांधवांशी संवाद साधत आहेत. आज ते बीडच्या दौऱ्यावर आले आहेत. बीड शहरातील शासकीय विश्रामगृहात संभाजीराजे आले असतांना यावेळी पंकजा मुंडे यांनी खासदार संभाजी राजे यांची सदिच्छा भेट यावेळी घेतली. मराठा आरक्षण जनसंवाद यात्रेसाठी संभाजीराजे बीडमध्ये आले आहेत. एकीकडे ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाला सुप्रिम कोर्टाने रद्द ठरवल्या नंतर मराठा समाज आरक्षण संदर्भातील पुनर्विचार याचिका कोर्टाने फेटाळून लावली आहे.

मात्र या झालेल्या भेटीत राजकीय वातावरणात आता तर्क वितर्क लढवले जातायेत, ओबीसी आरक्षणाच्या मागणीसाठी भाजपाकडून आंदोलन केले जात आहे. पंकजा मुंडे त्याचं नेतृत्व करत आहेत. तर दुसरीकडे मराठा आरक्षण चळवळीला घेऊन छत्रपती संभाजीराजे आक्रमक आहेत. आजच्या भेटीचा योगा योग असला तरी दोन्ही नेत्यात बराच वेळ चर्चा झाल्यानं, ही चर्चा नेमकी कशावर झाली ? याविषयी जोरदार चर्चा आता सुरू आहेत.

अबबब… तब्बल २५१ किलोचा हार-

बीडमध्ये आज २५१ किलोच्या फुलहाराने नेत्यांचं स्वागत करण्यात आलं, हा फुलहार उचलण्यासाठी जेसीबीची मदत घेण्यात आली. जेसीबीने गुलाल उधळण्याचा एक नवा ट्रेन्ड ऐकला होता. पण आता फुलहार तो देखील अडीच क्विंटल वजनाचा आणि त्याला उचलण्यासाठी जेसीबीची मदत घेण्यात आली. एवढंच नाही १५० किलो वजनाच्या फुलांची उधळण देखील नेत्यांच्या स्वागतासाठी याठिकाणी करण्यात आली. बीडमध्ये हा जल्लोष पाहायला मिळाला, भाजप नेत्या पंकजा मुंडे या सध्या बीड दौऱ्यावर आहेत, त्यांच आणि छत्रपती संभाजी राजे यांचं देखील या फुलहाराने स्वागत करण्यात आलं. यानंतर पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत छत्रपती संभाजी राजे यांचं स्वागत करण्यात आलं, यावेळी कार्यकर्त्यांनी संभाजी राजेंकडून जोरदार घोषणाबाजी केली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आघाडीच्या उमेदवारांवर विश्वास टाकल्याबद्दल खासदार सुप्रिया सुळे यांनी मतदारांचे मानले आभार

News Desk

मुख्यमंत्री सहाय्यता निधी’साठी ‘कोकण’ बँकेतर्फे 11 लाखांची पे-ऑर्डर

News Desk

आठवलेंची खडसेंना आरपीआयमध्ये येण्याची ऑफर 

News Desk