HW News Marathi
महाराष्ट्र

राष्ट्रीय कार्यकारणीत मला जे पद दिलं तो मी माझा सन्मान समजते, पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया

मुंबई | भाजपची राष्ट्रीय कार्यकारिणी आज (२६ सप्टेंबर) जाहीर केल्यानंतर पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. केंद्रात आता स्थान मिळाल्यानंतर पंकजा मुंडे आपली प्रतिक्रिया नोंदवत पक्षाने माझ्यावर जो विश्वास दाखवला त्याबद्दल मी त्यांची आभारी आहे असे म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची मी आभारी आहे. मला राष्ट्रीय कार्यकारिणीत जे स्थान देण्यात आलं आणि मला जे पद देण्यात आले तो मी माझा सन्मान समजते असेही त्यांनी म्हटले आहे.

भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि माजी मंत्री विनोद तावडे या दोघांनाही भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारणीत स्थान देण्यात आले आहे.यामध्ये राष्ट्रीय मंत्री म्हणून पंकजा मुंडे, विनोद तावडे यांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच, विजया रहाटकर आणि सुनील देवधर यांना राष्ट्रीय सचिव ही जबाबदारी देण्यात आली आहे. हा निर्णय झाल्यानंतर पंकजा मुंडे यांनी ट्विट करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे आभार मानले आहेत. तसेच, भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना पुन्हा एकदा पक्षाने डावलले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

वायुगळतीचा ‘भोपाळ ते तारापूर’ असा जीवघेणा प्रवास म्हणायचे ?

News Desk

कोकण सब हिसाब करेगा… याद रखना शिवसेना! नितेश राणेंनी डिवचलं

News Desk

संत भगवान बाबांची भक्ती अन् मुंडे साहेबांची शक्ती हाच तुमच्या-माझ्यातील प्रेमाचा धागा! – पंकजा मुंडे

Aprna